सिदरा अन्सारी हिने सांगितलं की, तिला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. शाळा तसेच चित्रकलेच्या शिक्षकांनी सातत्याने प्रोत्साहन दिल्याने ही आवड अधिक वाढली. शाळेमार्फतच या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची माहिती मिळाली आणि त्यानंतर तिने यामध्ये सहभाग नोंदवल्याचं सांगितलं.
advertisement
दक्षिण कोरियातील प्रदर्शनासाठी निवड
दक्षिण कोरियात होणाऱ्या या प्रदर्शनाबाबतचा ई-मेल तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांना आला होता. त्यानंतर महापालिकेच्या कला शिक्षण विभागाने विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देऊन चित्रे मागवली. आलेल्या चित्रांचे परीक्षण केल्यानंतर सिदरा अन्सारीसह आणखी 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व कलाकृतींना स्थान मिळणारं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन लवकरच दक्षिण कोरियात भरवले जाणार आहे. सिदरा अन्सारीच्या चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्थान मिळाल्यामुळे तिचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





