Pune: डेंजर नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले, 3 सेंकदाचा फक्त फरक, LIVE VIDEO

Last Updated:

शिवसेनेचे नेते वसंत मोरे आज गुरुवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह नवले पुलावर काय उपाय योजना करता येतील, यासाठी फेसबुक लाईव्ह करत होते.

News18
News18
पुणे : पुण्यातील नवले पूल म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. नवले पुलावर वारंवार अपघात घडतात आणि हकनाक निष्पाप लोकांची जीव जातो. मागील अनेक वर्षांपासून नवले पूल हा अपघातामुळे कायम चर्चेत राहिला आहे, पण उपाय योजना शुन्य आहे. अशातच शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे नवले पुलावर काय उपाय योजना करता येईल, हे पाहण्यासाठी गेले होते. पण, त्यावेळी एका भरधाव टेम्पो अगदी वसंत मोरेंच्या जवळून गेला. अवघ्या काही सेंकदाच्या फरकाने वसंत मोरे आणि त्याचे कार्यकर्ते थोडक्यात बचावले.
शिवसेनेचे नेते वसंत मोरे आज गुरुवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह नवले पुलावर काय उपाय योजना करता येतील, हे पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर लाईव्ह केलं होतं. वसंत मोरे यांनी नवले पुलावर उपाय योजना करण्यासाठी वेग मर्यादा पाळली पाहिजे, ६० किमीची मर्यादा आहे, त्या ऐवजी ३० किमी करावी, असं सांगत होते.
advertisement
नवले पुलाच्या महामार्गाच्या बाजूला उभं राहुन वसंत मोरे बोलत होते. पण अचानक त्याचवेळी एक भरधाव टेम्पो वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने गेला. भरधाव टेम्पो समोरून येताना पाहून वसंत मोरे जोरात किंचाळले, ये नितीन.., असं म्हणत नाही तेच  भरधाव टेम्पो  वसंत मोरे यांच्या बाजूने उभ्या असलेल्या कार्यकर्तांच्या अंगाजवळून गेला.
advertisement
टेम्पोचा वेग इतका होता की, मागे वळून पाहण्यापर्यंत दूरपर्यंत गेला होता. 'कसला गेला जोरात', असं कार्यकर्ते म्हणतच राहिले अन् टेम्पो पुढे एका रिक्षाला ओव्हरटेक करून फरार झाला. हा सगळा प्रकार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला. सुदैवाने वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीही झालं नाही. पण, जो काही प्रकार घडला तो अंगावर शहारे आणणारा होता. या घटनेनंतर वसंत मोरे यांनी पुढे ७ मिनिटांचं फेसबुक लाईव्ह केलं आणि आटोपतं घेतलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: डेंजर नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले, 3 सेंकदाचा फक्त फरक, LIVE VIDEO
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement