Success Story : 2 एकरमध्ये उभारलं कृषी पर्यटन केंद्र, महिन्याला 4 लाखांची निव्वळ कमाई, शिवाजी यांच्या यशाची कहाणी

Last Updated:

शिवाजी धोत्रे यांनी सुरू केलेले निसर्ग फार्म कृषी पर्यटन केंद्र सध्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे. दोन एकरांमध्ये उभारलेल्या या केंद्रावर हुरडा, रानमेवा, भेळ, तसेच चुलीवरचे जेवण अशा पारंपरिक स्वादांची खास सोय आहे.

+
चिखलठाणा

चिखलठाणा येथे 30 जणांना रोजगार; शिवाजी धोत्रे यांची कृषी पर्यटन केंद्रातून महिन्

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथे शिवाजी धोत्रे यांनी सुरू केलेले निसर्ग फार्म कृषी पर्यटन केंद्र सध्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे. दोन एकरांमध्ये उभारलेल्या या केंद्रावर हुरडा, रानमेवा, भेळ, तसेच चुलीवरचे जेवण अशा पारंपरिक स्वादांची खास सोय आहे. कुटुंबांसह येणाऱ्यांसाठी वेगळा किड्स झोन असल्याने दिवसभर येथे उत्साह पाहायला मिळतो. वाढती गर्दी आणि उत्तम व्यवस्थापनामुळे 30 स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायातून महिन्याला 15 लाखांची उलाढाल तर सुमारे 4 लाखांची निव्वळ कमाई होत असल्याचे शिवाजी धोत्रे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
चिकलठाणा येथील शिवाजी धोत्रे यांच्या निसर्ग फार्मचे पहिलेच वर्ष आहे. त्यांना ही कल्पना नाशिक येथील पेरूची वाडी हे फार्म बघितल्यानंतर सुचली, तसेच अशा ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. धोत्रे यांनी पेरूच्या वाडीमधील पक्षांची वाडी, किड्स झोन, रानमेवा यासह विविध बाबींचा अभ्यास केला, त्यामध्ये आवड निर्माण झाली आणि स्वतःचे सात एकर शेत असल्यामुळे त्यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये निसर्ग फार्मची निर्मिती केली.
advertisement
निसर्ग फार्ममध्ये 650 रुपयांचे प्रत्येक व्यक्तीला पॅकेज असते, पर्यटक सकाळी फार्ममध्ये आल्यानंतर त्यांना पोहे, मिसळ पाव, भजे, दुपारी बारा वाजेनंतर हुरडा, रानमेवा मक्याचे उकडलेले कणीस दिले जाते. त्यानंतर 3 वाजता जेवणाची वेळ असते. जेवणामध्ये शेवगा भाजी, वांग्याचे भरीत, ठेचा, बाजरीची भाकरी, चपाती हे सर्व खाद्यपदार्थ चुलीवर बनवले जातात. शनिवार आणि रविवारी 1 क्विंटल इतका हुरडा लागतो आणि इतर दिवसांमध्ये 30 किलोंच्या आसपास पर्यटकांसाठी केला जातो.
advertisement
छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, जळगाव या ठिकाणाहून पर्यटक फार्म बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. विशेषतः पक्षांची वाडी पाहण्यासाठी पर्यटक नेहमी गर्दी करत असतात. विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे लहान मुलांसह नागरिक देखील चांगला प्रतिसाद निसर्ग फार्मला देत असल्याची प्रतिक्रिया देखील धोत्रे यांनी दिली.
कृषी पर्यटन केंद्र कसे सुरू करावे?
सर्वप्रथम अगोदर महाराष्ट्रासह इतर ठिकाणांतील कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यावी, त्या कृषी पर्यटन केंद्राचे नियोजन बघावे, विविध प्रकारचे खेळ, स्विमिंग पूल, खाद्यपदार्थांचे नियोजन, ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था अशा आदी बाबींसह अभ्यास करावा, स्वतः मेहनत घेण्याची तयारी ठेवावी, योग्य पद्धतीने गुंतवणूक करावी आणि सातत्य ठेवावे तेव्हा या व्यवसायात यश मिळते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 2 एकरमध्ये उभारलं कृषी पर्यटन केंद्र, महिन्याला 4 लाखांची निव्वळ कमाई, शिवाजी यांच्या यशाची कहाणी
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement