advertisement

पाकिस्तानला चारही बाजूंनी घेरलं, कितीही धमक्या दिल्या तरी बॉयकॉट करता येणार नाही T20 वर्ल्ड कप!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला, त्यानंतर आता पाकिस्तानकडूनही बहिष्काराची धमकी दिली जात आहे.

पाकिस्तानला चारही बाजूंनी घेरलं, कितीही धमक्या दिल्या तरी बॉयकॉट करता येणार नाही T20 वर्ल्ड कप!
पाकिस्तानला चारही बाजूंनी घेरलं, कितीही धमक्या दिल्या तरी बॉयकॉट करता येणार नाही T20 वर्ल्ड कप!
दुबई : टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला, त्यानंतर आता पाकिस्तानकडूनही बहिष्काराची धमकी दिली जात आहे. बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तानकडून स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला जात आहे, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळायचं का नाही? याचा अंतिम निर्णय सरकार घेईल, असं मोहसिन नक्वी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भेटीनंतर म्हणाले आहेत. बहिष्काराची धमकी दिली जात असली, तरी पाकिस्तानला ते शक्य करून दाखवणं जवळपास अशक्य आहे, कारण आयसीसीने पाकिस्तानला चारही बाजूंनी घेरलं आहे.

1 कायदेशीर कारवाईमध्ये अडकणार पाकिस्तान

आयसीसी प्रत्येक मोठ्या स्पर्धेआधी सगळ्या पूर्ण सदस्य असलेल्या बोर्डांकडून टुर्नामेंट पार्टिसिपेशन एग्रीमेंट (TPA) वर सही करून घेते. हा कोणताही साधासुधा कागद नाही तर कायदेशीरदृष्ट्या बाध्य असा करार असतो. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाली तर या कराराचा भंग होईल, ज्यामुळे आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा वार्षिक महसूल रोखून धरेल. हा महसूल जवळपास 34-35 मिलियन डॉलर आहे. आधीपासूनच आर्थिक संकटात असणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल.
advertisement

2 पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बंदी

पाकिस्तानने वर्ल्ड कपमधून हटण्याचा निर्णय सरकारी दबावातून घेतल्याचं सिद्ध झालं, तर आयसीसी पीसीबीवर बंदीची कारवाईही करू शकते. आयसीसीच्या नियमांमध्ये कोणत्याही बोर्डामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचं दिसून आल्यास कडक कारवाईचं प्रावधान आहे.
झिम्बाब्वे आणि श्रीलंकेवर याआधी आयसीसीने निलंबनाची कारवाई केली होती. तसंच पाकिस्तानने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला तर त्यांना आशिया कपमधूनही बाहेर केलं जाईल. एवढंच नाही तर भविष्यात आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाची संधीही देणार नाही, ज्यात 2028 चा महिला टी-20 वर्ल्ड कपचाही समावेश आहे.
advertisement

3 पीएसएल परदेशी खेळाडूंशिवाय

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासारखी बोर्ड त्यांच्या खेळाडूंना पीएसएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी देणार नाहीत, त्यामुळे परदेशी खेळाडू पीएसएलमध्ये खेळू शकणार नाहीत. परदेशी खेळाडूंशिवाय पीएसएलची ब्रॅन्ड व्हॅल्यू, ब्रॉडकास्ट डील आणि स्पॉन्सरशीपही धोक्यात येईल, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी मोठा आर्थिक फटका बसेल.

4 द्विपक्षीय सीरिजही संकटात

advertisement
क्रिकेट फक्त आयसीसी स्पर्धाच नाही तर दोन देशांमधल्या सीरिजवरही अवलंबून आहे. जर पाकिस्तानने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला आणि आयसीसीने कारवाई केली तर दुसऱ्या क्रिकेट बोर्डाना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणंही बंद करावं लागेल, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा महसूलच बंद होईल.
एवढं मोठं आर्थिक संकट पाहता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तानला चारही बाजूंनी घेरलं, कितीही धमक्या दिल्या तरी बॉयकॉट करता येणार नाही T20 वर्ल्ड कप!
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement