Pranit More: सलमान खानबद्दल प्रश्न विचारताच प्रणित मोरेने जोडले हात, जोरजोरात हसू लागला अभिषेक बजाज, नक्की काय घडलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Pranit More: पॅप्सनी सलमान खानबद्दल विचारलेल्या प्रश्नावर प्रणितने कोणतंही मोठं उत्तर दिलं नाही. त्याने फक्त कॅमेऱ्यासमोर दोन्ही हात जोडले. काय होता तो प्रश्न?
मुंबई: 'बिग बॉस १९' हा शो नुकताच संपला असला तरी, शोमधील एकमेव मराठी स्पर्धक प्रणित मोरे अजूनही चांगलाच चर्चेत आहे. स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेतील हा 'महाराष्ट्रीयन भाऊ' घरातून बाहेर पडताच पुन्हा एकदा त्याच्या विनोदी सवयीमुळे चर्चेत आला आहे. विशेषतः, सुपरस्टार सलमान खानवर त्याने केलेल्या जुन्या विनोदांबद्दल त्याला वारंवार विचारले जात आहे!
स्टँडअप कॉमेडीवरून सलमानने प्रणितला फटकारलेले
'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी प्रणितने अनेक बॉलिवूड कलाकारांवर स्टँडअप कॉमेडी केली होती, ज्यात सलमान खानचाही समावेश होता. 'बिग बॉस'च्या एका भागात थेट सलमान खाननेच प्रणितच्या या जुन्या विनोदांचा समाचार घेतला होता. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान प्रणितला म्हणाला होता, "मला माहीत आहे तू माझ्यावर काय काय जोक्स केले आहेस. हे काही बरोबर नाही. लोकांना हसवण्यासाठी माझं नाव वापरायची तुला काहीच गरज नव्हती."
advertisement
सलमानच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर प्रणितने लगेचच त्याची माफी मागितली होती आणि भविष्यात असे विनोद पुन्हा करणार नसल्याचे आश्वासन दिले होते.
सलमान खानबद्दलच्या प्रश्नावर प्रणितने जोडले हात
नुकताच 'बिग बॉस १९' च्या स्पर्धकांचे एक रियुनियन झाले. यावेळी प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज एकत्र कॅमेऱ्यासमोर आले. पापाराझींनी ही संधी साधून प्रणितला थेट तोच प्रश्न विचारला, "प्रणित, आता पुन्हा सलमान खानवर व्हिडीओ करणार?" या थेट प्रश्नावर प्रणितने कोणतंही मोठं उत्तर दिलं नाही. त्याने फक्त कॅमेऱ्यासमोर दोन्ही हात जोडले आणि हलकेच हसला! या हात जोडण्याच्या कृतीतूनच त्याने नकळतपणे आपले उत्तर स्पष्ट केले की, 'आता हे पुन्हा नाही!'
advertisement
advertisement
एवढ्यावरच न थांबता, प्रणितने आपल्या खास शैलीत मिश्किल टिप्पणी केली. त्याने हसत-हसत पापाराझींना म्हटले, “मी मजेत राहावं; असं तुम्हाला वाटत नाही ना...” प्रणितच्या या हजरजबाबी उत्तरावर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांमध्ये एकच हशा पिकला!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 10:19 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Pranit More: सलमान खानबद्दल प्रश्न विचारताच प्रणित मोरेने जोडले हात, जोरजोरात हसू लागला अभिषेक बजाज, नक्की काय घडलं?











