TRENDING:

Shahrukh Khan : गौरीसाठी शाहरुख खानला जीवे मारायला निघाला होता! लग्नाआधीच दिली धमकी, कोण आहे तो?

Last Updated:
Shahrukh Khan Love Story : शाहरुख खान आणि गौरी खान यांची लव्हस्टोरी म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशीच आहे. पण असा एक किस्सा आहे, जेव्हा गौरीसाठी खुद्द शाहरुखवर बंदूक रोखण्यात आली होती!
advertisement
1/7
गौरीसाठी शाहरुख खानला जीवे मारायला निघाला होता! लग्नाआधीच दिली धमकी, कोण आहे तो?
मुंबई: पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही 'रोमान्सचा किंग' म्हणून ओळखले जाणारे शाहरुख खान आणि गौरी खान यांची लव्हस्टोरी म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशीच आहे. त्यांच्या प्रेमकथेचे अनेक किस्से नेहमीच ऐकायला मिळतात, पण असा एक किस्सा आहे जो ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. गौरीसाठी खुद्द शाहरुखवर बंदूक रोखण्यात आली होती!
advertisement
2/7
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गौरीवर किती प्रेम करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. दोघेही अगदी तारुण्यापासून एकत्र आहेत. शाहरुख जेव्हा अवघ्या १८ वर्षांचा होता, तेव्हाच तो गौरीच्या प्रेमात पडला होता, असे त्याने अनेकदा सांगितले आहे. गौरी तीच मुलगी होती, जिच्यावर शाहरुख पूर्णपणे फिदा झाला होता.
advertisement
3/7
शाहरुख आणि गौरीचे धर्म वेगळे असल्यामुळे त्यांच्या नात्यात सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. गौरीच्या कुटुंबाला लग्नासाठी राजी करण्यासाठी शाहरुखला खूप संघर्ष करावा लागला. या काळात दोघांनीही अनेक चढ-उतार पाहिले, पण कधीही एकमेकांची साथ सोडण्याचा विचार केला नाही. अखेर शाहरुख गौरीच्या कुटुंबाला पटवण्यात यशस्वी झाला आणि २५ ऑक्टोबर, १९९१ रोजी दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. आज हे कपल तीन लाडक्या मुलांचे पालक आहेत.
advertisement
4/7
लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचण्यापूर्वी शाहरुखला अनेक धमक्यांना सामोरे जावे लागले, हे फार कमी लोकांना माहीत आहे. गौरीचा भाऊ विक्रांत छिब्बर या नात्यामुळे अजिबात खुश नव्हता. खुद्द शाहरुखने कपिल शर्माच्या शोमध्ये विक्रांतसोबतच्या आपल्या नात्याबद्दल सांगितले होते. किंग खानने खुलासा केला की, जेव्हा तो गौरीला भेटायला जायचा, तेव्हा विक्रांत त्याला नेहमी धमकावायचा. गौरीसोबत कोणताही गैरव्यवहार करू नकोस, अशी तो शाहरुखला ताकीद द्यायचा.
advertisement
5/7
शाहरुखने सांगितले, "गौरीचा भाऊ स्वतःला मोठा गुंड समजत असे. तो जेव्हाही भेटायचा, तेव्हा गुंडगिरी दाखवायचा. मी त्याच्याशी नेहमी आदराने वागायचो." शाहरुखने असाही खुलासा केला की, एकदा तर विक्रांतने रागाने त्याच्यावर बंदूक रोखली होती आणि आपल्या बहिणीपासून दूर राहण्याची धमकी दिली होती. शाहरुख म्हणाला, "त्याने मला विचारले, तुला 'कट्टा' म्हणजे काय माहीत आहे का? मी म्हणालो, नाही, मला कट्टा म्हणजे काय ते माहीत नाही."
advertisement
6/7
गौरी खाननेही १९९४ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा भाऊ विक्रांत या नात्यामुळे अजिबात खुश नव्हता आणि तो शाहरुखला नेहमी धमकावत असे. "माझा भाऊ विक्रांत माझ्याबद्दल खूप पझेसिव्ह होता. तो नेहमी रागात असायचा. शाहरुख आणि माझ्या नात्यामुळे तो अजिबात खुश नव्हता," असे गौरीने सांगितले होते.
advertisement
7/7
शाहरुख खानने आपल्या कारकिर्दीत खूप मेहनत घेतली आहे. एका सामान्य मुलापासून सुपरस्टार बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आणि त्याला सोसाव्या लागलेल्या अडचणी त्याच्या चाहत्यांना चांगल्याच माहीत आहेत. पण शाहरुखने अनेकदा सांगितले आहे की, जर त्याला आपल्या करिअर आणि गौरीपैकी एकाची निवड करावी लागली, तर तो कोणत्याही परिस्थितीत गौरीलाच निवडेल आणि चित्रपट सोडून देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shahrukh Khan : गौरीसाठी शाहरुख खानला जीवे मारायला निघाला होता! लग्नाआधीच दिली धमकी, कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल