Shilpa Shetty Fitness : 50 व्या वर्षीही ग्लॅमरस दिसते शिल्पा शेट्टी! 'फिटनेस क्वीन' करते तरी काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shilpa Shetty Fitness Tips : शिल्पा शेट्टी अनेकदा योग आणि प्राणायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
1/8

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या फिटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे. आजच्या घडीला आपल्या फिटनेसने ती अनेकांना प्रेरणा देत आहे.
advertisement
2/8
शिल्पा शेट्टी प्रचंड फिटनेस फ्रीक आहे. आहाराकडे लक्ष देण्यासोबत योग आणि व्यायामदेखील ती नियमित करते.
advertisement
3/8
शिल्पा शेट्टी आपल्या दिवसाची सुरुवात आल्याचं पाणी पिऊन करते. दररोज न नुकता रिकाम्या पोटी ती आल्याचं पाणी पिते. शरिराला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यासाठी हे पाणी फायदेशीर असल्याचं तिचं म्हणनं आहे.
advertisement
4/8
शिल्पा शेट्टी खूप सरळ साधा नाश्ता करते. दलिया आणि कोरफडाचा ज्युसचा शिल्पाच्या नाश्त्यात समावेश असतो.
advertisement
5/8
शिल्पा शेट्टी आपल्या आहारात साखर ऐवजी ब्राउन शुगर, पांढऱ्या तांदळा ऐवजी ब्राउन राइस, पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राउन ब्रेडचा अवलंब करते.
advertisement
6/8
फिट राहण्यासाठी उकडलेल्या गोष्टी खाण्यावर शिल्पा भर देते. ऑलिव्ह तेलात जेवण शिजवते.
advertisement
7/8
शिल्पा शेट्टीच्या जेवणात प्रोटीन, फायबर आणि न्युट्रिशनयुक्त पदार्थांचा समावेश असतो. वरण-भात, भाकरी आणि चिंकन किंवा एखादी भाजी या गोष्टी शिल्पाच्या दुपारच्या जेवणात असतात.
advertisement
8/8
शिल्पा शेट्टी रात्रीच्या जेवणात 1 बाउल सूप पिते. तसेच झोपण्याआधी न चुकता योग आणि वेट ट्रेनिंगदेखील करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shilpa Shetty Fitness : 50 व्या वर्षीही ग्लॅमरस दिसते शिल्पा शेट्टी! 'फिटनेस क्वीन' करते तरी काय?