Shivjayanti : शिवनेरीवर दिसले बालशिवाजी, नतमस्तक झाला रितेश देशमुख; म्हणाला इतक्या वर्षांनंतर आजही...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ritesh Deshmukh At Shivneri : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी अभिनेता रितेश देशमुख शिवनेरीवर पोहोचला. तिथं त्याला बाल रूपातील शिवाजींचं दर्शन झालं. त्यांना पाहूनच तो भारावून गेला.
advertisement
1/5

शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सोव सुरू आहे. यासाठी अभिनेता रितेश देशमुखही शिवनेरीवर पोहोचला. तिथं जाताच त्याला बालशिवाजींचं दर्शन झालं. त्यांना पाहताच तो नतमस्तक झाला.
advertisement
2/5
रितेश देशमुखने शिवनेरीवर शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथून तो बाहेर आला आणि त्याला बाल रूपातील शिवाजी दिसले. शिवाजी महाराजांच्या वेशातील एक मुलगा. ज्याच्यासमोर रितेश देशमुख नतमस्तक झालेला दिसला.
advertisement
3/5
यानंतर रितेश देशमुखने सर्व शिवभक्तांना, शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, आज सौभाग्याचा दिवस आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यांची कीर्ती, शौर्य सगळ्यांनाच माहिती आहे. इतक्या वर्षांनंतरही ते आपल्याला नवीन ऊर्जा देतात, प्रेरणा देतात. आज आपल्यासारख्या भक्तांसाठी प्रेरणेचा दिवस आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा सगळ्यांना मिळो.
advertisement
4/5
रितेश पुढे म्हणाला, शिवभक्त, शिवप्रेमींना महाराजांची प्रेरणा काय आहे ते माहिती आहे, त्यांनी या राष्ट्रासाठी काय केलं आहे, काय बलिदान दिलं आहे. आजही त्यांच्या गाथा सगळ्या मुलांना सांगायला हव्यात. त्यापासून प्रेरित होऊन एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करायला हवा.
advertisement
5/5
"त्यांचं पूर्ण आयुष्यच प्रेरणा आहे. त्यांच्याबाबत जितकं जाणून घेता येईल, जितकी माहिती घेता येईल, ती घ्या. हेच आपल्या देशासाठी, देशातील लहान मुलं, तरुण आणि सगळ्यांसाठी चांगलं आहे", असं रितेश म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shivjayanti : शिवनेरीवर दिसले बालशिवाजी, नतमस्तक झाला रितेश देशमुख; म्हणाला इतक्या वर्षांनंतर आजही...