GST ऑफिसर होती, सरकारी नोकरी सोडून बनली अभिनेत्री; आता डेटिंग शोमध्ये शोधतेय नवरा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
GST ऑफिसर होती ही अभिनेत्री पण अभिनयासाठी नोकरी सोडली. आता डेटिंग शोमध्ये ती स्वत:साठी नवरा शोधतेय. कोण आहे ही अभिनेत्री?
advertisement
1/9

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी शिक्षण एका वेगळ्या क्षेत्रात घेतलं पण कलेची आवड त्यांना अभिनय क्षेत्रात घेऊन आली.
advertisement
2/9
अशीच एक अभिनेत्री जी आधी GST ऑफिसर होती. सरकारी नोकरी करत होती. चांगले पैसे देखील मिळत होते. मात्र हे सगळं सोडून तिनं अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/9
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजेच कृति वर्मा. अभिनेत्रीचं नाव याआधी जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आलं होतं. त्यानंतर आता ती डेटिंग शोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
advertisement
4/9
कृति वर्मा ही एल्विश यादव आणि जिया शंकर यांच्या एंगेज्ड 2 या डेटिंग शोमध्ये आली आहे.
advertisement
5/9
कृति या शोमध्ये येण्याआधी GST ऑफिसर होती. पण हिरोईन होण्यासाठी तिनं नोकरी सोडली. त्यानंतर ती मॉडेलिंग करिअरमध्ये आली. अनेक वेब सीरिज, रिअलिटी शओमध्ये ती दिसली आहे.
advertisement
6/9
2018 मध्ये आलेल्या रोडीज या शोमध्ये ती दिसली होती. नेहा धूपियाच्या हँगमध्ये ती होती. शोमध्ये नेहमीच दुसऱ्या स्पर्धकांसमोर तिची भांडणं चर्चेत आली होती.
advertisement
7/9
रोडीजनंतर कृति बिग बॉस 12 मध्ये दिसली होती. घरात तिनं खूप हंगामा केला होता. कृति सध्या ट्रेंड डान्सर, डीजे शो देखील होस्ट करते. सध्या ती खूप ग्लॅमर आयुष्य जगतेय. काही वेब सीरिजमध्येही तिनं काम केलं आहे.
advertisement
8/9
कृति सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिला 2.5 मिलियनहून लोक फॉलो करतात.
advertisement
9/9
कधी काळी खुर्चीत बसून हजारो रुपये पगार घेणारी कृति नोकरी सोडून अभिनेत्री झाली. आता तिच्यावर डेटिंग शोमध्ये नवरा शोधण्याची वेळ आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
GST ऑफिसर होती, सरकारी नोकरी सोडून बनली अभिनेत्री; आता डेटिंग शोमध्ये शोधतेय नवरा