श्रद्धा कपूरची लगीनघाई, रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत बोहल्यावर चढणार? भाऊ सिद्धांतने सांगूनच टाकलं
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाऊ सिद्धांतने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडमधून नेहमीच सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या समोर येत असतात. नुकतीच कृति सेननची बहीण नुपूर सेनन लग्नबंधनात अडकली आहे. अशातच आता एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूर आहे.
advertisement
2/7
श्रद्धा कपूर तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत लवकरच लग्न करणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान आता याबाबत अभिनेत्री भाऊ सिद्धांत कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
3/7
श्रद्धा कपूर आपला रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता यावर अभिनेत्रीच्या भावाने प्रतिक्रिया दिली असून सिद्धांतने एका वाक्यात या बातम्यांना स्पष्ट नकार दिला आहे.
advertisement
4/7
सिद्धांतने लिहिलं आहे,"ही तर माझ्यासाठीही न्यूज आहे". सिद्धांतच्या या कमेंटवरून हे स्पष्ट होतं की श्रद्धा सध्या लग्न करण्याच्या मूडमध्ये नाही. मात्र तिचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
5/7
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी डेट करत असल्याच्या चर्चा 2024 पासून सुरू आहेत. त्यावेळी दोघांना मुंबईत एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यानंतर अनेकदा दोघे अनेक पार्ट्या आणि फिल्म स्क्रीनिंग्समध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत.
advertisement
6/7
श्रद्धा कपूर शेवटची 'स्त्री 2' या सिनेमात झळकली होती. तिची ही फिल्म बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली. या सिनेमात श्रद्धासह राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना हे कलाकार झळकले होते.
advertisement
7/7
श्रद्धा कपूरने नुकतंच 'ईथा' या फिल्मचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता 'नागिन'मध्ये एका सुपरनॅचरल भूमिकेत ती दिसणार आहे. याशिवाय 'स्त्री 3'चीही जोरदार चर्चा सुरू आहे. पण या सगळ्या चित्रपटांसह चाहत्यांना तिच्या लग्नाचीदेखील तेवढीच उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
श्रद्धा कपूरची लगीनघाई, रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत बोहल्यावर चढणार? भाऊ सिद्धांतने सांगूनच टाकलं