Smita Patil Niece : स्मिता पाटीलची भाची, 27 व्या वर्षीच नवरा गमावला; शाहरुखच्या सिनेमात काम करून झाली होती स्टार, आता करते काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Smita Patil Niece : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या तीन बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पण तुम्हाला माहितीये का स्मिता पाटीलची भाची अभिनेत्री होती. वयाच्या 27 व्या वर्षी तिने तिचा नवरा गमावला. आता ती काय करते?
advertisement
1/10

अभिनेत्री स्मिता पाटीलनं मराठीच नाही हिंदी सिनेविश्वात आपली ओळख निर्माण केली. स्मिता ही सुसंस्कृत घरातील मुलगी होती. तिला तीन बहिणी होत्या. तिच्या तिन्ही बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. पण स्मिताची एक भाजी मात्र सिनेसृष्टीत काम करत होती. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी तिने नवरा गमावला आणि ती विधवा झाली. आज ती 51 वर्षांची असून फिटनेसमध्ये हिरोईन्सना मागे टाकते.
advertisement
2/10
जर तुम्ही शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' हा सिनेमा पाहिला असेल तर त्यात स्मिता पाटीलची भाची आहे. विद्या मालवदे असं तिचं नाव आहे. विद्या तिच्या फिटनेस आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत आहे. तिचं डेली रुटीन अनेक लोकांना प्रेरणा देते. हिच विद्या काही वर्षांआधी तिच्या पतीच्या निधनानंतर पूर्णपणे खचली होती.
advertisement
3/10
विद्याने निरोगी, नैसर्गिक जीवन जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला फिटनेस ध्येये निश्चित करण्यासाठी इन्स्पायर केलं आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्ट लाखो प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत.
advertisement
4/10
विद्या मालवदेच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. 1997 मध्ये विद्याने इंडियन एअरलाइन्सचे पायलट कॅप्टन अरविंद सिंग बग्गा यांच्याशी लग्न केलं. पण अवघ्या तीन वर्षांनी 14 जुलै 2000 रोजी तिच्या नवऱ्याचं पटना येथे विमान अपघातात निधन झालं. वयाच्या 27 व्या वर्षी विद्याच्या पदरी निराशा आली. ती विधवा झाली.
advertisement
5/10
नवऱ्याच्या निधनानंतर विद्या मालवदे पूर्ण खचली होती. आपलं आयुष्य संपवण्याचाही तिने विचार केला होता. पण ती त्यातून बाहेर आली.
advertisement
6/10
विद्या मालवदेने मॉडेलिंगद्वारे तिचा प्रवास सुरू केला. त्यानंतर 'इंतहा' सिनेमातून तिने डेब्यू केला. 'चक दे इंडिया' आणि 'मिसमॅच्ड' सारख्या सिनेमात तिने काम केलं आहे. विद्या मालवदे चित्रपट दिग्दर्शक संजय दायमा यांची भेट घेतली. त्यांच्यात एक खास बंध निर्माण झाला. दोघांमधील प्रेम खुललं. त्यांच्यासोबत तिचं आयुष्य स्थिरावलं आहे.
advertisement
7/10
विद्या तिचा दिवस सकाळी 5.20 वाजता सुरू करते. ती एका तासाहून अधिक काळ ध्यान करते आणि मंत्र जप करते. तिची सकाळ सकारात्मकता आणि शांतीने सुरू करते.
advertisement
8/10
विद्या मालवदे सकाळी एक हेल्दी ज्युस पिते. ज्यामध्ये लिंबू, दालचिनी, त्रिफळा, सुके आले, सफरचंद सायडर व्हिनेगर आणि कोमट पाण्यात एक चमचा तूप घातलं जातं. हे ड्रिंक आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास, पचन करण्यास आणि त्वचा चमकदार करण्यास मदत करते.
advertisement
9/10
विद्या मालवदेचा नाश्ता सहसा हलका पण पोटभर असतो. ती नाश्त्यात बदाम आणि अक्रोडसह बेसन आणि टोफू चिल्ला खाते. त्यानंतर ती सांबार, रताळे आणि फुलकोबी करी, टोफू साउट आणि तूप, आणि बीट आणि एवोकॅडो सॅलडसह असं पौष्टिक दुपारचे जेवण घेते. तिचं रात्रीचं जेवण खूप हलकं असतं.
advertisement
10/10
विद्या मालवदे आठवड्यातून दोनदा शाकाहारी आहार घेते. ती अंडी आणि मासांहार करते. देशी तूपातील पदार्थ ती खाते. छान, शांत झोप यावी यासाठी विद्या जायफळ पावडरसह अर्धा चमचा तूप गरम करून प्रत्येक नाकपुडीत दोन थेंब टाकण्याचा सल्ला देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Smita Patil Niece : स्मिता पाटीलची भाची, 27 व्या वर्षीच नवरा गमावला; शाहरुखच्या सिनेमात काम करून झाली होती स्टार, आता करते काय?