बिग बॉस फेम अभिनेत्याने 33 व्या वर्षी गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, समोर आले फोटो
- Published by:News18 Trending Desk
Last Updated:
Kavin Raj Marriage PICS: यंदा अनेक सेलेब्स लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवानी-सिद्धार्थ मल्होत्रा, अथिया शेट्टी - केएल राहुल यासारख्या सेलेब्सनी आयुष्यभर साथ राहण्याची शपथ घेत लग्नगाठ बांधली आङे. आता आणखी एक स्टार लग्नबंधनात अडकला आहे
advertisement
1/6

Kavin Raj Marriage PICS: यंदा अनेक सेलेब्स लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवानी-सिद्धार्थ मल्होत्रा, अथिया शेट्टी - केएल राहुल यासारख्या सेलेब्सनी आयुष्यभर साथ राहण्याची शपथ घेत लग्नगाठ बांधली आङे. आता आणखी एक स्टार लग्नबंधनात अडकला आहे. साऊथ स्टार कविन राजने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
advertisement
2/6
तमिळ अभिनेता कविन राजने आज, 20 ऑगस्ट रोजी सकाळी एका खाजगी समारंभात त्याची गर्लफ्रेंड मोनिका डेव्हीसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या नवविवाहित जोडप्याला चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
advertisement
3/6
फोटो पाहून लक्षात येईल की, दोघांनीही पारंपारिक कपडे परिधान केले आहे. मोनिका डेव्ही पारंपारिक जरीच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. या साडीवर तिनं पारंपारिक दागिने घातले आहेत. दोघांचीही जोडी खूपच सुंदर दिसत आहे.
advertisement
4/6
चाहते आणि जवळचे मित्र या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केला आहे. मात्र, त्यांच्या लग्नात साऊथचा एकही मोठा स्टार दिसला नाही. या दोघांचे आजच्या दिवसाचे काही खास BTS व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
advertisement
5/6
कविन हा एक भारतीय अभिनेता आहे जो मुख्यतः तमिळ सिनेमात काम करतो. छोट्या पडद्यापासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, त्याने सरवनन मीनाची या दूरचित्रवाणी कार्यक्रमात खलनायक वेट्टैयनची भूमिका साकारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. नंतर त्याचे रूपांतर खलनायकातून नायकामध्ये झाले. 2019 मध्ये, केविन बिग बॉस सीझन 3 मध्ये एक स्पर्धक होता. लिफ्ट आणि दादा यासारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.
advertisement
6/6
स्टार विजयच्या काना कानुम कलंगल या चित्रपटातून कविनने पहिल्यांदाच स्क्रीनवर हजेरी लावली आणि शिवाच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर या कॉलिवूड अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. मिस्ट्री हॉरर फिल्म पिझ्झा आणि टीव्ही मालिका थयुमानवनमधील त्याच्या भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बॉस फेम अभिनेत्याने 33 व्या वर्षी गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, समोर आले फोटो