अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला कोण?
मिडिया रिपोर्टनुसार, बुधवारी युएईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात चायनामन स्पिनर कुलदीप यादव, फिनिशर रिंकू सिंग आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन हे प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतील. तसेच हर्षित राणालाही संधी मिळणार नाही. उपकर्णधार शुभमन गिल आणि टी-ट्वेंटी नंबर-1 फलंदाज अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करतील. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.
advertisement
तिलक वर्मा कुठं खेळणार?
टी- ट्वेंटी नंबर-2 फलंदाज तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर संधी मिळेल. त्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पंड्या खेळताना दिसेल. तसे, कधीकधी अक्षर पटेल देखील या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग आहेत. या तिघांना साथ देण्यासाठी अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे देखील आहेत.
UAE विरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन -
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह और अर्शदीप सिंह.