छोट्या पडद्यावरचे दिग्गज कलाकार, घेणार सीएम फडणवीसांची मुलाखत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गेली अनेक वर्ष छोट्या पडदा गाजवणारे दोन दिग्गद कलाकार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे. कोण आहे ते दोन कलाकार?
advertisement
1/6

छोटा पडद्यावरचे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असतात. दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणारे छोट्या पडद्यावरचे कलाकार प्रेक्षकांना नेहमीच आपले वाटतात. मालिका आणि टेलिव्हिजनमध्ये काम करणारे असेच काही कलाकार आता राजकीय व्यासपीठावर दिसणार आहेत.
advertisement
2/6
सध्या निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक कलाकार पक्ष प्रवेश करत आहेत. अनेक कलाकार प्रचार रॅलींमध्ये दिसत आहेत. असेच काही छोट्या पडद्यावरचे कलाकार आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेताना दिसणार आहेत.
advertisement
3/6
नागपूरमध्ये राजकीय आणि सांस्कृतिक विश्वाचे लक्ष वेधून घेणारा एक खास कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे.
advertisement
4/6
या प्रकट मुलाखतीची खासियत म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि अनुभवी कलाकार स्पृहा जोशी व भरत गणेशपुरे हे दोघेही मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. अभिनय क्षेत्रातील अनुभव, सामाजिक भान आणि प्रेक्षकांशी असलेली नाळ लक्षात घेता ही मुलाखत नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर होणार असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
5/6
विदर्भातील किंग म्हणून ओळखले जाणारे अभिनेते भारत गणेशपुरे मुख्यमंत्र्यांची मुलाखत कशी घेणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. चला हवा येऊ द्या या शोमध्ये देखील भारत यांनी अनेकदा राजकीय भूमिका उत्तमरित्या वठवल्या आहेत.
advertisement
6/6
तर दुसरीकडे आपल्या शब्दांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी देखील भारत गणेशपुरे यांना साथ देणार आहे. भारत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेताना काय रंगत आणणार हे 8 जानेवारीलाच पाहायला मिळेल.