TRENDING:

'सूर नवा ध्यास नवा' मधून 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याची एक्झिट; बाहेर पडताच केलेली ती पोस्ट चर्चेत

Last Updated:
'कलर्स मराठी' या वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपे एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. काही दिवसांपूर्वी त्याने गायक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 'सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा' या पर्वात तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. पण आता नुकतंच त्याचं एलिमिनेशन झालं आणि तो या स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर समीरने एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
1/8
सूर नवा ध्यास नवा' मधून सुंदरा मनामध्ये भरली फेम अभिनेत्याची एक्झिट; म्हणाला...
'सूर नवा ध्यास नवा' या शोमध्ये समीरने आपल्या आवाजाने परीक्षकांसह श्रोत्यांची मनं जिंकली. प्रेक्षक समीरच्या अभिनयासोबतच त्याच्या आवाजाचेही चाहते झाले.
advertisement
2/8
काल ‘सूर नवा ध्यास नवा' या शोमधून समीरचं एलिमिनेशन झालं आणि तो या स्पर्धेतून बाहेर पडला. याचनिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर भलीमोठी भावुक पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत.
advertisement
3/8
समीर परांजपेने ‘सूर नवा ध्यास नवा’मधील आतापर्यंतच्या प्रवासाचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं आणि त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं. आपण असहाय्य पणे फक्त बघत राहतो हळहळत राहतो…'
advertisement
4/8
'कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे २-४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे सीरि seriously करायला हवं होतंस नाव काढलं असतंस हे ऐकून उगाचंच खूश होत राहतो. हे सगळं मी ही अनुभवलं आहे. पण अशीच एखादी राहून गेलेली गोष्ट फिरून परत आली तर? त्यावेळी राहून गेलं होतं काही कारणांनी म्हणतोस ना चल आता संधी आहे आता काय कारण देतोस बोल असे नियातीनेच पत्ते पिसले तर?? मी ही तेच केलं.. हावरटा सारखं गाणं जगून घेतलं.'
advertisement
5/8
पुढे समीरनं म्हणाला,'सूर नवा ध्यास नवाच्या निमित्ताने पुन्हा गाणं करण्याची संधी मला दिलीत यासाठी सर्वप्रथम कलर्स मराठीचे खूप आभार. कलर्स मराठीची सगळी टीम तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे मी गाऊ शकलो.'
advertisement
6/8
'आमचे सगळे म्युझिशिअन आणि त्यांचे कॅप्टन @mithileshpatankar दादा तुम्ही वेळोवेळी केलेल्या सूचना आणि तू मस्त गा ऐनवेळी काही झालंच तर 'कॅच' पकडायला आहोत तुम्ही या दिलेल्या विश्वासामुळे मी बिनधास्तपणे गाऊ शकलो. @ajitparab75 दादा तुमच्याकडून काव्य/ कविता/ गाणं कसं वाचावं हे शिकायला मिळालं. चाल बसली आहे आता “शब्द गा” ही तुम्ही केलेली सूचना कायम लक्षात राहील आणि कायम मी तो प्रयत्न करेन' असं समीर म्हणाला.
advertisement
7/8
पुढे या शोची होस्ट अभिनेत्री रसिका सुनीलविषयी अभिनेत्याने लिहिलं, “रसिका सुनील तूही सूर नवा चा प्रवास माझ्यासारखाच “जगतीयेस”. बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल आणि उत्तम अभिनेत्री मागची हळवी कलाकार मला कळली आणि खूप भावली. आपली मैत्री इथून सुरू झाली आहे ती अशीच राहील याची खात्री आहे. माझ्या सगळ्या स्पर्धक मित्रांनो तुमच्याकडून ही खूप गोष्टी शिकलो. तुम्ही सगळे कमाल आहात. गाते रहो…' अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
advertisement
8/8
दरम्यान, समीरने एक्झिट घेतल्याने त्याचे काही चाहते नाराज झाले आहेत. आता यानंतर गायक म्हणून समीरचा प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सूर नवा ध्यास नवा' मधून 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याची एक्झिट; बाहेर पडताच केलेली ती पोस्ट चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल