TRENDING:

सुपरस्टार अरिजीत सिंहने अभिजीत सावंतकडे केलेली कळकळीची विनंती, फुकटात काम करायला तयार झालेला गायक, असं काय घडलेलं?

Last Updated:
Abhijeet Sawant-Arijit singh: सध्या अभिजीत त्याच्या गाण्यांमुळे नाही, तर एका अशा माणसाच्या गुपितामुळे चर्चेत आहे, ज्याच्या आवाजाशिवाय बॉलीवूड अपूर्ण आहे, तो म्हणजे अरिजीत सिंह.
advertisement
1/10
अरिजीतने अभिजीतकडे केलेली कळकळीची विनंती, फुकटात काम करायला तयार झालेला गायक
मुंबई : २००५ मध्ये जेव्हा 'इंडियन आयडॉल'चा पहिला सिझन आला, तेव्हा या धारावीच्या मुलाने अख्ख्या देशाला आपल्या आवाजावर नाचवलं होतं.
advertisement
2/10
'मोहब्बते लुटाऊँगा' म्हणत घराघरांत पोहोचलेला अभिजीत सावंत मधल्या काळात थोडा गायब होता, पण 'बिग बॉस मराठी ५' ने त्याला पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आणलं.
advertisement
3/10
सध्या अभिजीत त्याच्या गाण्यांमुळे नाही, तर एका अशा माणसाच्या गुपितामुळे चर्चेत आहे, ज्याच्या आवाजाशिवाय बॉलीवूड अपूर्ण आहे, तो म्हणजे अरिजीत सिंह.
advertisement
4/10
अमोल परचुरेंच्या 'कॅचअप' कार्यक्रमात अभिजीतने २००७-०८ सालातील एक अत्यंत हळवा किस्सा सांगितला. त्यावेळी अरिजीत आजच्यासारखा सुपरस्टार नव्हता.
advertisement
5/10
अभिजीत सांगतो, "अरिजीत एकदा माझ्याकडे आला आणि म्हणाला, 'भैय्या, मला माझ्या गावात एक कॉन्सर्ट करायचा आहे.' त्याचं गाव कोलकात्यापासून बरंच लांब आहे, तिथे पोहोचायला आजही चार तास लागतात.
advertisement
6/10
अरिजीत म्हणाला की, 'माझ्या गावात अनेक समस्या आहेत, मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आपण तुमचा एक चॅरिटेबल शो करूया, तिकीटं विकू आणि जो पैसा येईल तो मी माझ्या गावाच्या विकासासाठी देईन.'"
advertisement
7/10
अरिजीतची ही तळमळ पाहून अभिजीत भारावून गेला होता. त्याने अरिजीतला एक मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला, "अरिजीत, माझ्या एका शोमधून तू किती पैसे गोळा करणार? जर तुला तुझ्या गावाची परिस्थिती बदलायची असेल, तर तुला मोठा विचार करावा लागेल."
advertisement
8/10
त्यानंतर अभिजीत, अरिजीत आणि प्राजक्ता शुक्रे हे तिघेही थेट सोनू निगम यांच्याकडे गेले. सोनूजींना ही संकल्पना आवडली, त्यांनी होकारही दिला, पण काही तांत्रिक कारणांमुळे तो शो होऊ शकला नाही. पण अरिजीतचं आपल्या मातीबद्दलचं प्रेम पाहून अभिजीत आजही त्याला 'गौतम बुद्ध' म्हणतो.
advertisement
9/10
अरिजीत सिंहने अलीकडेच पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली, ज्यामुळे संगीत विश्वात खळबळ उडाली. यावर भाष्य करताना अभिजीत सावंतने इंडस्ट्रीचं एक काळं सत्य समोर आणलं.
advertisement
10/10
तो म्हणाला, "आज गायकांना मिळणारं मानधन खूप कमी आहे. अनेक गायक तर केवळ प्रसिद्धीसाठी फुकटातही काम करतात. अरिजीतसारख्या माणसाला हे मान्य नसावं, म्हणूनच तो आता स्वतःचं स्वतंत्र संगीत बनवणार आहे."<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुपरस्टार अरिजीत सिंहने अभिजीत सावंतकडे केलेली कळकळीची विनंती, फुकटात काम करायला तयार झालेला गायक, असं काय घडलेलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल