Suraj Chavan : जान्हवी आली, पण...! लग्नाच्या 4 महिन्यांनी सूरज चव्हाणने पहिल्यांदाच बोलून दाखवली खंत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणने पहिल्यांदाच त्याच्या लग्नाला न आलेल्यांबद्दल खंत व्यक्त केली. सूरज नेमकं काय म्हणाला?
advertisement
1/7

मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आला आहे. त्याच्या लग्नाला कोणीही न आल्यामुळे काही महिन्यांपूर्वी रंगलेली चर्चा आता पुन्हा ताजी झाली आहे. लग्नानंतर तब्बल चार महिन्यांनी सूरजने यावर पहिल्यांदाच उघडपणे भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
2/7
डिसेंबर महिन्यात सूरज चव्हाणचं लग्न झालं. सूरजने त्याच्या मामाची मुलगी संजनाबरोबर लग्न केलं. या खास दिवशी त्याने बिग बॉस मराठी 5 मधील सर्व स्पर्धकांना आवर्जून आमंत्रण दिलं होतं. इतकंच नाही तर मराठी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
advertisement
3/7
रितेश देशमुख आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लग्नासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. तसेच कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिलाही खास निमंत्रण होतं. सूरज तिला बहिण मानतो त्यामुळे तिच्या उपस्थितीची विशेष अपेक्षा होती.
advertisement
4/7
इतक्या मोठ्या प्रमाणावर निमंत्रण देऊनही प्रत्यक्षात फारच कमी लोकांनी हजेरी लावली. सूरजच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, डीपी दादा आणि पुरुषोत्तम दादा पाटील हेच प्रमुख पाहुणे उपस्थित होते. विशेष म्हणजे 'झापुक झुपूक'चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही लग्नाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्येही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.
advertisement
5/7
लग्नानंतर काही काळ शांत राहिल्यानंतर सूरजने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. सूरज म्हणाला, "जान्हवी आणि निक्की माझ्या बहिणी आहेत. शेवटपर्यंत माझी बहिण थांबली. कुणी नाही आलं पण जान्हवी आली. निक्कीला काही तरी अडचण होती. तिला शूट होतं म्हणून ती आली नाही. नाहीतर तीपण आली असती. अरबाज आणि ती येणार होते जोडीने."
advertisement
6/7
या सर्व प्रकारामुळे सूरजच्या मनात थोडी नाराजी असल्याचं स्पष्ट दिसून आलं. विशेषतः ज्यांना तो जवळचा मानत होता त्यांची अनुपस्थिती त्याला खटकली असल्याचं त्याच्या बोलण्यातून जाणवलं.
advertisement
7/7
सूरजच्या लग्नात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर त्याची करवली म्हणून मिरवली. जान्हवीची सूरजच्या लग्नातील उपस्थितीत विशेष लक्षवेधी ठरली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan : जान्हवी आली, पण...! लग्नाच्या 4 महिन्यांनी सूरज चव्हाणने पहिल्यांदाच बोलून दाखवली खंत