Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाणची लगीन घाई! कधी आणि कुठे आहे लग्न? समोर आल्या डिटेल्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan : बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण नोव्हेंबर महिन्यात लग्न करतोय. त्याचं लग्न कुठे आणि कधी आहे याचे डिटेल्स समोर आलेत.
advertisement
1/7

‘बिग बॉस मराठी सीझन 5’चा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सूरज चव्हाण हा केवळ बिग बॉसचा विजेता नाही, तर सोशल मीडियावर लाखो चाहत्यांचा लाडका स्टार आहे. त्याचं लग्न आता मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
2/7
सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात जोमात सुरू आहे. सूरज आणि त्याची होणारी बायको नुकतीच समोर आली आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा चाहत्यांना दाखवला.
advertisement
3/7
अंकिता स्वत: सूरज आणि संजनाच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहे. सूरजच्या लग्नाविषयी चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. तो लग्न कधी आणि कुठे करणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
advertisement
4/7
सूरजच्या लग्नाचे विधी 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक समारंभ होणार आहेत. सूरज आणि संजना दोघंही त्यांच्या या खास दिवसासाठी खूप उत्साही आहेत.
advertisement
5/7
सूरजच्या घरात लग्नाचं वातावरण आहे. सूरजचं नवं घर देखील बनून तयार आहे. लग्नानंतर सूरजच्या नव्या घरात त्याच्या बायकोचा गृहप्रवेश होणार आहे.
advertisement
6/7
सूरज चव्हाणचा लग्नसोहळा हा 29 नोव्हेंबरला पार पडणार आहे. पुण्याजवळील जेजूरी, सासवड येथे लग्न होणार आहे. सूरजचं लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे.
advertisement
7/7
सूरजचं लव्ह मॅरेज आहे. संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अंकितानेच सूरजच्या बायकोविषयी ही माहिती दिली. सूरज आणि संजना एकमेकांना लहान असल्यापासून ओळखतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाणची लगीन घाई! कधी आणि कुठे आहे लग्न? समोर आल्या डिटेल्स