TRENDING:

Great Khali : एकेकाळी WWE गाजवणारा ग्रेट खली... आता झाली अशी अवस्था, ओळखताही येणार नाही, शॉकिंग Photo

Last Updated:
द ग्रेट खली! 90 च्या दशकातील पिढीसाठी परिचित असलेलं नाव. लहानपणापासून मोठे होईपर्यंत अनेकांनी त्याला सुपरहिरो म्हणून पाहिलं.
advertisement
1/6
एकेकाळी WWE गाजवणारा ग्रेट खली... आता झाली अशी अवस्था, ओळखताही येणार नाही, Photo
WWE मध्ये ग्रेट खलीला पाहिल्यानंतर अनेक भारतीयांना हा शो पाहायला सुरूवात केली. WWE वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झालेल्या या हेवीवेट खेळाडूचं नाव दलिप सिंग राणा आहे. खलीचा जन्म 27 ऑगस्ट 1972 ला हिमाचल प्रदेशातील धीरेना येथील एका लहान गावात झाला. आठ भावंडांमध्ये खली एक होता.
advertisement
2/6
7 फुटाची उंची, 157 किलो वजनामुळे खली थेट WWE मध्ये पोहोचला आणि प्रकाशझोतात आला. लहान वयातच त्याने कुटुंबाला मदत करण्यासाठी काम करायला सुरूवात केली. नंतर त्याला पंजाब पोलिसात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून तो व्यायाम करू लागला.
advertisement
3/6
खलीने दोन वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला, त्यानंतर तो अमेरिकेमध्ये गेला आणि व्यावसायिक कुस्तीमध्ये सामील झाला. वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर खलीने 2006 साली WWE सोबत करार केला, यानंतर त्याचं आयुष्यच बदललं.
advertisement
4/6
अंडरटेकरसोबतच्या फाईटमध्ये विजय मिळवल्यानंतर खली लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याने जॉन सिना, केन, रे मिस्टिरियो आणि इतर अनेक प्रसिद्ध WWE स्टार्ससोबत फाईट केली. 2007 मध्ये खलीने बॅटल रॉयल जिंकले आणि वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशीपमध्येही विजय मिळवला.
advertisement
5/6
WWE रिंग व्यतिरिक्त त्याने वेगवेगळ्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही खली दिसला. द लॉन्गेस्ट यार्ड, गेट स्मार्ट, रेसलिंग आणि रामा-द सेव्हियर यासह अनेक चित्रपटांमध्ये खलीने काम केलं.
advertisement
6/6
एकेकाळी WWE मध्ये वर्चस्व गाजवणारा खली आता खूप शांत आयुष्य जगत आहे. खलीचा एक फोटो सध्या समोर आला आहे, जो पाहून त्याला ओळखणंही अनेकांना कठीण झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Great Khali : एकेकाळी WWE गाजवणारा ग्रेट खली... आता झाली अशी अवस्था, ओळखताही येणार नाही, शॉकिंग Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल