'मी एकदाच काम करतो, पण टॉपचं करतो', 'झापुक झुपूक'नंतर सुरज चव्हण अल्लू अर्जुनसोबत काम करणार? साऊथ डेब्यूबद्दल म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Suraj Chavan about his south debut: सुरज चव्हाणने त्याच्या सर्वात मोठ्या इच्छेबद्दल मोकळेपणाने सांगितलं असून सध्या त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. सुरजला लवकरच साऊथ फिल्म्समध्ये काम करायचं आहे.
advertisement
1/10

'बिग बॉस मराठी ५' चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सुरज चव्हाण सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडिया ते बिग बॉसचं घर ते मराठी सिनेसृष्टी असा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.
advertisement
2/10
बिग बॉसनंतर लगेचच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजला त्यांच्या फिल्ममध्ये लीड रोल देण्याची घोषणा केली होती. त्याच्यासाठी त्यांनी खास 'झापुक झुपूक' ही फिल्म तयार केली होती. पण दुर्दैवाने ही फिल्म फारशी चालली नाही.
advertisement
3/10
अशातच सुरज चव्हाणने त्याच्या सर्वात मोठ्या इच्छेबद्दल मोकळेपणाने सांगितलं असून सध्या त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. सुरजला लवकरच साऊथ फिल्म्समध्ये काम करायचं आहे.
advertisement
4/10
नुकत्याच एका मुलाखतीत सुरज चव्हाणने त्याच्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल मोठी माहिती दिली आहे. तो म्हणाला, "मला साऊथ इंडस्ट्रीत जायचंय आणि मी ते करूनच दाखवणार! तिथल्या चित्रपटातली ॲक्शन मला लय भारी वाटते. 'बिग बॉस'च्या घरातही मी ती ॲक्शन करून दाखवली होती."
advertisement
5/10
सुरज पुढे म्हणाला, "मला बिग बॉसच्या घरात कोणीतरी जंगली म्हणालं होतं. मी गावठी असलो, तरीही कोणाला आवरत नाही. सुरज आला, असं म्हटलं तरी समोरच्याला भीती वाटते. कारण सुरज चव्हाण म्हणजे एक वादळ आहे."
advertisement
6/10
बिग बॉसच्या घरातील सुरजचा रांगडा स्वभाव त्याच्या चाहत्यांना खूप भावला होता. अशातच आता त्याच्या नजरा साऊथ सिनेसृष्टीकडे वळल्या आहेत. सुरजला साऊथच्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा आहे.
advertisement
7/10
आपल्या साध्या आणि तितक्याच रोकठोक शैलीत सूरजने आता साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्याला थेट 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनसोबत काम करायचं आहे.
advertisement
8/10
सूरजला त्याच्या आवडत्या साऊथ अभिनेत्याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता अल्लू अर्जुनचं नाव घेतलं. सूरज म्हणाला, "मला अल्लू अर्जुन लय आवडतो. तो एकच चित्रपट करतो पण असा भारी करतो की अख्खं जग बघत राहतं. तसंच माझं पण आहे, मी एकदाच काम करतो पण ते टॉपचं असतं. माझा लूक पण तिकडच्या लोकांसारखाच रांगडा आहे."
advertisement
9/10
साऊथच्या चित्रपटांमधील रांगडेपणा आणि तिथली मातीतील कथानकं आपल्या स्वभावाला साजेसी असल्याचं सूरजचं ठाम मत आहे. अल्लू अर्जुनच्या स्टाईलवर फिदा असलेल्या सूरजला आता त्याच्यासोबत एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकण्याची ओढ लागली आहे.
advertisement
10/10
मराठीतून साऊथकडे जाणारा हा रस्ता सोपा नाही, याची जाणीव सूरजला आहे. म्हणूनच त्याने मदतीसाठी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचं नाव घेतलं आहे. सयाजी शिंदे यांनी साऊथमध्ये स्वतःचा मोठा दबदबा निर्माण केला आहे. "सयाजी शिंदेंशी माझा संपर्क झाला आणि त्यांनी मला ओळख करून दिली, तर मी साऊथ इंडस्ट्री नक्कीच गाजवीन." असा विश्वास सूरजला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी एकदाच काम करतो, पण टॉपचं करतो', 'झापुक झुपूक'नंतर सुरज चव्हण अल्लू अर्जुनसोबत काम करणार? साऊथ डेब्यूबद्दल म्हणाला...