'स्वामिनी' मालिकेची हिट जोडी, रेवती लेलेच्या लग्नानंतर को स्टारचा गुपचूप साखरपुडा, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते रेवती लेलेच्या लग्नानंतर तिच्या को स्टारने देखील गुपचूप साखरपुडा उरकला आहे. अभिनेत्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
advertisement
1/8

मराठी टेलिव्हिजनच्या काही ऐतिहासिक मालिकांपैकी एक मालिका म्हणजे स्वामिनी. रमाबाई आहे माधवराव पेशवे यांची प्रेमकहाणी या मालिकेत दाखवण्यात आली होती.
advertisement
2/8
या मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेवती लेले काही दिवसांआधीच लग्नबंधनात अडकली. रेवतीनं बिझनेसमनशी लग्न केलं.
advertisement
3/8
रेवतीनंतर तिचा स्वामिनी मालिकेतील को स्टार म्हणजे माधवराव पेशवेंची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय पटवर्धन देखील लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी त्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
advertisement
4/8
चिन्मय पटवर्धनने मृण्मयी परांजपेबरोबर साखरपुडा केला. अत्यंत साध्या पद्धतीनं आणि मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा पार पडला.
advertisement
5/8
"दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर प्लिज प्रामाणिक रहा. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मी तुझ्यावर प्रेम करतो!" असं कॅप्शन देत चिन्मयने साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत.
advertisement
6/8
चिन्मयची होणारी बायको मृण्मयी नेमकी कोण आहे? त्यांची भेट कुठे झाली? त्यांचं लग्न कधी आहे? लव्ह स्टोरी काय? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.
advertisement
7/8
चिन्मयने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तो 'इंद्रायणी' मालिकेत काम करत होता. या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तो सध्या 'भूमिका' या प्रसिद्ध नाटकात काम करतोय. 2019 साली आलेल्या 'स्वामिनी' मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती.
advertisement
8/8
सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनसराई सुरू आहे. अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि शुभंकर जोशी यांनी नुकतंच लग्न केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'स्वामिनी' मालिकेची हिट जोडी, रेवती लेलेच्या लग्नानंतर को स्टारचा गुपचूप साखरपुडा, PHOTO