Disha Vakani : वडिलांना शेवटचा निरोप...! दिशा वकानी आणि भाऊ मयुरची वाईट अवस्था
- Published by:Priya Lad
Last Updated:
Disha Vakani Father Funeral : तारक मेहता का उल्टा चष्मामधील दयाबेन आणि सुंदर म्हणजे दिशा वकानी आणि मयुर वकानी यांचा वडील भीम वकानी यांना शेवटचा निरोप देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
1/7

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील दया म्हणजे दिशा वकानी आणि सुंदर म्हणजे मयुर वकानी ऑनस्क्रिन सगळ्यांना खळखळून हसवणारी ही भावाबहिणीची जोडी. ज्यांच्या खऱ्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
2/7
दिशा आणि मयुर हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे भाऊबहीण, त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. वडिलांना शेवटचा निरोप देताना त्यांची अवस्था वाईट झाली आहे.
advertisement
3/7
दिशा वकानी आणि मयुर वकानीचे वडील भीम वकानी. जे तारक मेहता... शोचाही भाग राहिले आहेत. तारक मेहता... चे निर्माते असित मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली.
advertisement
4/7
भीम वकानी यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. ते अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकारही होते. त्यांनी शाहरुख खान, सलमान खान आणि अजय देवगण यांच्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
advertisement
5/7
भीम वकानी यांनी 'लगान', 'हम दिल दे चुके सनम', 'स्वदेस' आणि 'देवदास' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये छोट्या पण प्रभावी भूमिका साकारल्या. इतकंच नाही तर गुजराती रंगभूमीवरील त्याचं योगदानही प्रशंसनीय आह. जिथे त्याने अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
advertisement
6/7
तारक मेहता या मालिकेच्या एका भागात भीम वकानी यांनी जेठालालच्या बापूजींच्या मित्राची भूमिका साकारली होती.
advertisement
7/7
भीम वकानी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. वडिलांना शेवटचा निरोप देताना दिशा आणि मयुर यांची रडूनरडून खूप वाईट अवस्था झाली. दोघांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Disha Vakani : वडिलांना शेवटचा निरोप...! दिशा वकानी आणि भाऊ मयुरची वाईट अवस्था