'तारक मेहता...'मध्ये आठ वर्षांनी दयाबेन परतणार? 'अब्दुल'चा मोठा खुलासा; स्वत:ला म्हणाला, असित मोदींचा लकी चार्म!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आठ वर्षांनी दयाबेन परतणार का? याबाबत 'अब्दुल'ने मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणाऱ्या दयाबेनने ही मालिका सोडून आठ वर्षे झाली असून आजही चाहते तिच्या कमबॅकची प्रतीक्षा करत आहेत. आता अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद सांकलाने दिशा वकानीच्या परतण्याबाबत मौन सोडले आहे.
advertisement
2/7
शरद सांकलाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अब्दुल ही भूमिका साकारली आहे. अनेक दिवसांपासून तो या मालिकेचा महत्त्वाचा भाग आहे. अलीकडेच त्याने दयाबेनच्या पुनरागमनाबाबत आणि शोचे निर्माता असित मोदी यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. शरद सांकला ‘द आवारा मुसाफिर’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आणि असित मोदींसोबत आपले नाते खूप खास असल्याचे सांगितले. तो सुरुवातीपासूनच त्यांच्या सोबत काम करत आहे.
advertisement
3/7
सिटकॉम शोमध्ये ‘तारक मेहता…’चे निर्माता असित मोदी यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल अब्दुल सांगतो की ते दोघे खूप जुने मित्र आहेत. ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे की तो आणि असित मोदी मित्र आहेत.
advertisement
4/7
अब्दुल म्हणतो,"नीला टेली फिल्म्सच्या पहिल्याच शोमध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केले होते. एका अर्थाने मी त्यांच्यासाठी लकी ठरलो, कारण त्यांच्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात माझ्याबरोबरच झाली होती.” तो पुढे सांगतो की असित मोदी त्याला आपला लकी चार्म मानतात.
advertisement
5/7
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत बोलताना अब्दुल म्हणतो," जेव्हा त्याने अभिनयाची सुरुवात केली होती, तेव्हा त्याला बहुतेक वेळा लहानसहान भूमिका मिळायच्या. त्या काळात त्याला फक्त हिरोच्या मित्राचीच भूमिका मिळत असे. नंतर हळूहळू परिस्थिती बदलली आणि विनोदी भूमिकांना महत्त्व मिळू लागले. कॉमेडियन कलाकारांना चांगल्या भूमिका मिळू लागल्या. तो सांगतो की त्या काळात कोणतीही भूमिका नाकारणे त्याच्यासाठी शक्य नव्हते.
advertisement
6/7
दयाबेनच्या शोमधील पुनरागमनाबद्दल शरद सांकला म्हणतो की, आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेन परत येणे शक्य वाटत नाही, पण तरीही याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. तो म्हणतो की असित मोदींना कोणताही कलाकार शो सोडून जाऊ नये असे वाटते. दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीला शो सोडून आठ वर्षे झाली असून, या आठ वर्षांपासून प्रेक्षक तिची वाट पाहत आहेत".
advertisement
7/7
अब्दुल पुढे सांगतो की, प्रेक्षकांप्रमाणेच असित मोदीही दिशा वकानीच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. अब्दुलच्या मते, जर ती शोमध्ये परत आली तर ते खूपच छान असेल, आणि जर ती परत आली नाही तर निर्माते पुढे जाण्यासाठी कोणता तरी दुसरा मार्ग नक्कीच शोधतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तारक मेहता...'मध्ये आठ वर्षांनी दयाबेन परतणार? 'अब्दुल'चा मोठा खुलासा; स्वत:ला म्हणाला, असित मोदींचा लकी चार्म!