किती दिवस छोटी कार चालवणार? आता फॅमिलीसाठी SUV घ्याच! 19 किमी मायलेज,किंमतही 6 लाखांपासून
- Published by:Sachin S
Last Updated:
Nissan Magnite ही सेफ्टीच्या बाबतीतही पुढे आहे. Nissan Magnite ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
advertisement
1/11

भारतात जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर कारच्या किंमती SUV आता मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. अशातच जपानची वाहन उत्पादन कंपनी निसान मोटर्सने मागील काही दिवसांपासून चांगलंच कमबॅक केलं आहे. सगळ्यात स्वस्त अशी MPV भारतात आणली आहे. आता निसान मोटर्सने आपली लोकप्रिय Nissan Magnite 2026 चं CNG आता AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) मॉडेल आणलं आहे.
advertisement
2/11
Nissan Magnite मध्ये आता सीएनजी सुद्धा उपलब्ध झालं आहे. या मॉडेलची सुरुवाती किंमत ही फक्त 6.89 लाख रुपये आहे. त्यामुळे मायलेजदार एसयूव्हीमध्ये हा एक बेस्ट पर्याय आहे.
advertisement
3/11
Nissan Magnite मध्ये ऑटो डिमिंग IRVM, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, क्लायमेट कंट्रोल, टाइप-C चार्जिंग पोर्ट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, रिमोट स्टार्टसह की फॉब, ऑटो हेडलॅम्प्स, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर दिला आहे.
advertisement
4/11
Nissan Magnite मध्ये पेट्रोल इंजिनमध्ये निसान मॅग्नाइट लाइनअपमध्ये 1.0 लीटर नॅच्युरल पेट्रोल आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय दिला आहेत. NA इंजिन 72PS पॉवर आणि टॉप टॉर्क देते, तर टर्बो-पेट्रोल युनिट 100PS पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड मिळतो.
advertisement
5/11
आपल्या सेगमेंटमध्ये परफॉर्मन्सच्या बाबतीत ही कार उत्तम आहे. मायलेज आणि गिअरबॉक्स पर्यायांमध्ये NA पेट्रोल इंजिनसोबत 5-स्पीड AMT युनिट मिळते, तर टर्बो-पेट्रोल इंजिनसाठी ऑप्शनल CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.
advertisement
6/11
निसान मोटर्सने दावा केला आहे की, Nissan Magnite ही 19.4kmpl (NA पेट्रोल MT), 19.7kmpl (NA पेट्रोल AMT), 20kmpl (टर्बो-पेट्रोल MT) आणि 17.4kmpl (टर्बो-पेट्रोल CVT) मायलेज देते.
advertisement
7/11
Nissan Magnite ही भारतातील कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे कंपनीने तिला CNG किटसह मार्केटमध्ये लॉन्च केलं आहे.
advertisement
8/11
विशेष म्हणजे, Nissan Magnite ही सेफ्टीच्या बाबतीतही पुढे आहे. Nissan Magnite ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील मॉडेलवर मिळाले आहे.
advertisement
9/11
Nissan Magnite मध्ये मजबूत बॉडी फ्रेम आणि 6 एअरबॅग्स सारखे फिचर्स दिल्यामुळे मिळाले आहे. मोठ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5-स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षा टेस्टमध्ये 3-स्टार रेटिंग मिळाले आहे. Nissan Magnite ही बजेट फ्रेंडली सेफ एसयूव्ही आहे.
advertisement
10/11
Nissan Magnite सीएनजी व्हेरिएंट्स Acenta, N-Connecta, Tekna आणि Tekna+ मध्ये उपलब्ध असणार आहे. याची किंमत अनुक्रमे ही 7.89 लाख, 8.51 लाख, 9.38 लाख आणि 9.70 लाख रुपये इतकी आहेत.
advertisement
11/11
Nissan Magnite CNG मध्ये रेट्रो-फिट CNG किट लावलेली आहे. ही CNG किट फॅक्टरी अप्रूव्ह्ड आहे आणि सर्व अधिकृत निसान डीलरशिपवर 72,000 रुपयांच्या अतिरिक्त शुल्कात मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
किती दिवस छोटी कार चालवणार? आता फॅमिलीसाठी SUV घ्याच! 19 किमी मायलेज,किंमतही 6 लाखांपासून