'एकाच घरात दोन वेगवेगळं आयुष्य… 2021 मध्ये नेमकं काय घडलं?' संगिताने घटस्फोटाच्या अर्जात केले 'हे' खळबळजनक आरोप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गेल्या काही काळापासून विजयची पत्नी संगीता सार्वजनिक कार्यक्रमांतून गायब असल्याने चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण त्यांच्या नात्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
advertisement
1/8

चंदेरी दुनियेत चमकणाऱ्या ताऱ्यांचं आयुष्य बाहेरून जितकं सुखकर दिसतं, तितकंच ते आतून गुंतागुंतीचं असू शकतं. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'सुपरस्टार' आणि तामिळनाडूच्या राजकारणात नुकतीच एन्ट्री केलेला अभिनेता थलपथी विजय (Thalapathy Vijay) सध्या अशाच एका वैयक्तिक वादळामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
2/8
गेल्या काही काळापासून विजयची पत्नी संगीता सार्वजनिक कार्यक्रमांतून गायब असल्याने चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण त्यांच्या नात्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. संगीता यांनी चेंगुलपट्टू न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृत अर्ज दाखल केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी विजयवर केलेले आरोप ऐकून दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली आहे.
advertisement
3/8
एका 'अभिनेत्री'मुळे संसाराला तडा?संगीता यांनी आपल्या घटस्फोटाच्या याचिकेत अत्यंत गंभीर आणि वैयक्तिक आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहेतर संबंध असल्याचा दावा संगीता यांनी केला आहे. एप्रिल 2021 मध्ये त्यांना याबद्दल माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला. "विजयने अभिनेत्रीसोबतचे संबंध सुरूच ठेवले, जे माझ्यासाठी मानसिक छळ आणि वैवाहिक विश्वासाचे उल्लंघन आहे," असे संगीता यांनी याचिकेत म्हटले आहे. 2021 पासून ते एकाच घरात असूनही मनाने पूर्णपणे वेगळे राहत होते.
advertisement
4/8
परदेश दौरे आणि सोशल मीडिया पोस्टघटस्फोटाच्या अर्जात संगीता यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे ज्याने त्यांना आणि त्यांच्या मुलांना खूप त्रास दिला. त्या म्हणतात की, ती अभिनेत्री अनेकदा विजयसोबत परदेश दौऱ्यावर जात असे आणि तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. विजयने कधीही या फोटोंचे खंडन केले नाही किंवा त्यावर स्पष्टीकरण दिले नाही, उलट त्याने अप्रत्यक्षपणे त्याचे समर्थन केले, असा आरोप संगीता यांनी केला आहे.
advertisement
5/8
"गरज पडल्यास अभिनेत्रीचे नाव उघड करेन"संगीता यांनी सध्या त्या अभिनेत्रीचे नाव गुप्त ठेवले आहे. "मला कोणाचीही सार्वजनिक प्रतिमा मलीन करायची नाही. पण जर विजयकडून माझ्यावर दबाव आला, तर मी त्या अभिनेत्रीचे नाव उघड करेन आणि तिला या प्रकरणात सह-प्रतिवादी (Second Respondent) करेन," असा इशाराही त्यांनी दिला आहे. विजयने संगीता यांच्या घरगुती अधिकारांवर आणि फिरण्यावरही निर्बंध घातले होते, असा दावा त्यांनी केला आहे.
advertisement
6/8
राजकीय प्रवासावर काय परिणाम होणार?विजयने नुकताच 'तामिळनाडू वेत्री कझगम' (TVK) नावाचा आपला राजकीय पक्ष स्थापन केला आहे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते जोमाने तयारी करत आहेत. अशा महत्त्वाच्या वळणावर त्यांच्या पत्नीने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चेंगुलपट्टू सत्र न्यायालयाने आता हे प्रकरण कौटुंबिक कल्याण न्यायालयाकडे (Family Welfare Court) वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
7/8
पोटगी आणि मुलांचा प्रश्नसंगीता यांनी विजयच्या उत्पन्नाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करून योग्य 'पोटगी' (Alimony) मागितली आहे. सुरुवातीला त्यांनी दोनदा सामोपचाराने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरल्याने अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
advertisement
8/8
थलपथी विजयच्या व्यावसायिक यशाच्या शिखरावर असतानाच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हे वादळ त्यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक आहे. आता न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देतं आणि विजय यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'एकाच घरात दोन वेगवेगळं आयुष्य… 2021 मध्ये नेमकं काय घडलं?' संगिताने घटस्फोटाच्या अर्जात केले 'हे' खळबळजनक आरोप