आधी टोळी फुटली, आता टोळीतील सदस्य घराबाहेर! रोशन भजनकरची Bigg Boss Marathi 6 मधून एक्झिट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Roshan Bhajankar Eliminated : Bigg Boss Marathi 6 मधून रोशन भजनकर आऊट झाला आहे. रोशनचा 50 दिवसांचा प्रवास संपला. रोशनच्या एक्झिटने टोळीला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरात मोठी उलथापालथ झाली आहे. शनिवारीच घरातील एक सदस्य आऊट झाला आहे. मराठी बिग बॉसच्या घरातून रोशन भजनकरची एक्झिट झाली आहे. रोशन भजनकर तब्बल 50 दिवसांनी बिग बॉसमधून बाहेर पडला आहे.
advertisement
2/7
घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून वातावरणात चांगलीच रंगत आली होती. तिच्या येण्याने घरात माजामस्ती वाढली, वाद वाढले आणि समीकरणं बदलली. विशेष म्हणजे तन्वीही यानंतर थोडी शांत झालेली दिसत होती. या सगळ्या घडामोडींमध्ये रोशन भजनकर मात्र संयमित आणि शांत खेळ खेळताना दिसला होता.
advertisement
3/7
रोशन भजनकरचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अमरावतीचा एक सामान्य माणूस बॉडीबिल्डर बनतो आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतो हेच त्यांच्यासाठी मोठं यश मानलं जात होतं. त्याने घरात कोणत्याही आक्रमक रणनीतीऐवजी शांत आणि समतोल भूमिका घेतली. इतर सदस्यांसोबत त्याचे थोडेफार वाद झाले, मात्र त्यांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत.
advertisement
4/7
राखीकडून वारंवार होणाऱ्या टोमण्यांमुळे आणि 'हमाल' अशा शब्दांत केलेल्या उल्लेखामुळे रोशन दुखावला होता. तरीही त्याने संयम सोडला नाही.
advertisement
5/7
या आठवड्यात घरातील टोळी आधीच फुटली होती. अनुश्री मानेने टोळी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या गटात फक्त विशाल, रुचिता आणि रोशन उरले होते. आता रोशन भजनकरची एक्झिट झाली आणि टोळी पूर्णपणे विस्कळीत झाली. टोळीत आता फक्त विशाल आणि रुचिता उरले आहेत.
advertisement
6/7
आता रोशनच्या बाहेर पडल्यानंतर घरातील समीकरणं कशी बदलणार, टोळीतील उरलेले सदस्य कशी रणनीती आखणार आणि राखी सावंतच्या उपस्थितीत पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
7/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. दुसरी वाईल्ड कार्ड कोण असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी टोळी फुटली, आता टोळीतील सदस्य घराबाहेर! रोशन भजनकरची Bigg Boss Marathi 6 मधून एक्झिट