TRENDING:

सेटवर भेटली अन् दिरासोबत जमवलं लग्न, 'ठरलं तर मग'च्या सायलीची सासू आहे या अभिनेत्रीची जाऊ

Last Updated:
'ठरलं तर मग' मालिकेतील सायलीची सासू मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची जाऊ आहे. दोघींनी एकत्र मालिकेत कामही केलं आहे.
advertisement
1/9
सेटवर भेटली अन् दिरासोबत जमवलं लग्न, 'ठरलं तर मग'च्या सायलीची सासू आहे या अभिनेत्रीची जाऊ
मराठी मालिकांमधील कलाकारांच्या ऑनस्क्रीन नात्यांइतक्याच त्यांच्या ऑफस्क्रीन गोष्टीही रंजक असतात. अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. नवरा बायको आहोत जे एकाच क्षेत्रात काम करत आहे.
advertisement
2/9
सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत सायलीच्या सासूची कल्पनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांच्याबाबत एक खास आणि अनोखी गोष्ट समोर आली आहे.
advertisement
3/9
अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांची जाऊ देखील मनोरंजन विश्वात सक्रीय असून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.प्राजक्ता दिघे एका मालिकेच्या सेटवर भेटल्या आणि त्यांना ती अभिनेत्री आवडली. त्यांनी थेट आपल्या दिरासाठी तिचा मागितला.
advertisement
4/9
ही अभिनेत्री म्हणजे कविता लाड मेढेकर. प्राजक्ता दिघे आणि कविता लाड यांनी केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर ऑनस्क्रीनही एकत्र काम केलं आहे.
advertisement
5/9
'चार दिवस सासूचे' या लोकप्रिय मालिकेत दोघी जावा म्हणून झळकल्या होत्या. त्या मालिकेत कविता लाड यांनी अनुराधा ही भूमिका साकारली होती.प्राजक्ता दिघे यांनीच कविता लाड यांचं लग्न जमवलं होतं. याबाबत प्राजक्ता दिघे यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
6/9
प्राजक्ता दिघे म्हणाल्या, "कविता लाडचा नवरा माझ्या नवऱ्याचा सख्खा चुलत आतेभाऊ आहे. मीच त्यांचं लग्न जमवलं. चार दिवस सासूचे मालिकेच्या वेळी कविताच्या घरी तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू होती. घरच्यांकडून तिला मुलं बघण्याबाबत सांगितलं जात होतं.
advertisement
7/9
तेव्हा मी तिला माझ्या दीराबद्दल सांगितलं. मी म्हणाले, माझा दीर आहे, खूप देखणा आहे. त्यानंतर मी त्यांची भेट घालून दिली आणि त्यातूनच त्यांचं लग्न ठरलं.
advertisement
8/9
आणखी एक खास योगायोग म्हणजे कविता लाड यांच्या पतीनेच प्राजक्ता दिघे आणि त्यांच्या पतीचं लग्न जुळवण्यात मदत केली होती. त्यामुळे प्राजक्ता यांनी एकप्रकारे त्या उपकारांची परतफेडच केली, असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
9/9
प्राजक्ता दिघे यांचे पती राजन दिघे आणि कविता लाड यांचे पती आशिष मेढेकर हे एकमेकांचे सख्खे चुलत आत्ते भाऊ आहेत. त्यामुळे या दोन अभिनेत्रींचं नातं अधिकच घट्ट झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सेटवर भेटली अन् दिरासोबत जमवलं लग्न, 'ठरलं तर मग'च्या सायलीची सासू आहे या अभिनेत्रीची जाऊ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल