TRENDING:

Bollywood चा तो अर्धवट Movie, ज्याने रचला इतिहास, पॅन इंडिया ठरला ब्लॉकबस्टर

Last Updated:
अनेकदा मोठ्या कलाकारांनी नाकारलेली कथा एखाद्या दुसऱ्या अभिनेत्याचे नशीब पालटवून टाकते. असाच काहीसा प्रकार 2013 मध्ये घडला होता, जेव्हा एका 'रिजेक्टेड' स्क्रिप्टने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.
advertisement
1/8
Bollywood चा तो अर्धवट Movie, ज्याने रचला इतिहास, पॅन इंडिया ठरला ब्लॉकबस्टर
बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपटांची घोषणा होते. काही चित्रपट खूप गाजावाजा करून सुरू होतात, पण अर्ध्यावरच डब्यात जातात. तर काही चित्रपट असे असतात जे सुरुवातीला कोणालाच आवडत नाहीत, पण पडद्यावर आल्यावर मात्र 'इतिहास' घडवतात. अनेकदा मोठ्या कलाकारांनी नाकारलेली कथा एखाद्या दुसऱ्या अभिनेत्याचे नशीब पालटवून टाकते. असाच काहीसा प्रकार 2013 मध्ये घडला होता, जेव्हा एका 'रिजेक्टेड' स्क्रिप्टने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.
advertisement
2/8
हा चित्रपट दुसरा तिसरा कोणी नसून रोहित शेट्टी आणि शाहरुख खानचा 'चेन्नई एक्सप्रेस' होता. आज या चित्रपटाच्या मेकिंगमागचा तो रंजक प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
3/8
दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या कामात व्यस्त असताना अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. पलीकडून आवाज होता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा. शाहरुखने रोहितला भेटीसाठी बोलावले. सुरुवातीला या दोघांना 1982 च्या प्रसिद्ध 'अंगूर' चित्रपटाचा रिमेक बनवायचा होता. पण त्याच वेळी रोहितने शाहरुखला आपली एक जुनी स्क्रिप्ट ऐकवली, जी 2008 पासून धूळ खात पडली होती.
advertisement
4/8
रोहित शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ही स्क्रिप्ट त्याने त्या काळातील 2-3 तरुण अभिनेत्यांना ऐकवली होती, पण त्यांनी ती नाकारली. मात्र, शाहरुखला ही गोष्ट इतकी आवडली की 'अंगूर' बाजूला राहिली आणि अवघ्या 8 महिन्यात 'चेन्नई एक्सप्रेस' तयार झाली.
advertisement
5/8
बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊससुमारे 115 Crore च्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरातून 396 Crore रुपयांची बंपर कमाई केली. त्याकाळी 'थ्री इडिअट्स'चा रेकॉर्ड मोडणारा हा पहिला चित्रपट ठरला. भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद 100 Crore कमावण्याचा विक्रमही याच चित्रपटाच्या नावावर झाला होता.
advertisement
6/8
चित्रपटातील काही 'हटके' गोष्टीदीपिकाचा साऊथ लूक: दीपिका पदुकोणला तामिळ भाषेचा 'एक्सेंट' (उच्चार) पकडण्यासाठी तब्बल ४ दिवस लागले होते.लुंगी डान्सची क्रेझ: यो यो हनी सिंगचे 'लुंगी डान्स' हे गाणे सुपरस्टार रजनीकांत यांना श्रद्धांजली म्हणून ठेवले होते, जे आजही लग्नसराईत वाजते.
advertisement
7/8
चित्रपट प्रदर्शित होत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध केला होता, कारण त्याच वेळी 'दुनियादारी' हा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जोरात चालत होता. अखेर रोहित शेट्टीने राज ठाकरेंची भेट घेतली आणि मराठी चित्रपटाचे स्क्रीन कमी होणार नाहीत, असे आश्वासन दिल्यावर वाद मिटला.
advertisement
8/8
चित्रपटात दाखवलेला गोव्याचा 'दूधसागर धबधबा' प्रेक्षकांसाठी मोठे आकर्षण ठरला. तसेच, 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मधील प्रसिद्ध रेल्वे सीनची आठवण करून देणारा सीन यामध्ये दीपिका आणि शाहरुखवर चित्रीत करण्यात आला होता. रोहित शेट्टीच्या चित्रपटात सहसा अजय देवगण असतो, पण हा त्यांचा पहिला चित्रपट होता ज्यात अजय देवगण नव्हता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood चा तो अर्धवट Movie, ज्याने रचला इतिहास, पॅन इंडिया ठरला ब्लॉकबस्टर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल