TRENDING:

25 व्या वर्षी अभिनेत्री झाली विधवा, नंतर 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत केलं दुसरं लग्न!

Last Updated:
Guess the Celebrity: एक सुंदर अभिनेत्री जिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य खूप दुःखद होतं. एक वेळ तर अशीही आली होती की तिच्या मनात टोकाचं पाऊल उचल्याचाही निर्णय आला होता. ही अभिनेत्री कोण होती तिच्याविषयी आणखी जाणून घेऊया.
advertisement
1/9
25 व्या वर्षी विधवा, नंतर 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत केलं दुसरं लग्न!
एक सुंदर अभिनेत्री जिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य खूप दुःखद होतं. एक वेळ तर अशीही आली होती की तिच्या मनात टोकाचं पाऊल उचल्याचाही निर्णय आला होता. ही अभिनेत्री कोण होती तिच्याविषयी आणखी जाणून घेऊया.
advertisement
2/9
अभिनयाने इंडस्ट्रीवर आपली छाप सोडणारी ही अभिनेत्री आहे लीना चांदवरकर. अवघ्या 24 व्या वर्षी तिचं लग्न झालं. 25 व्या वर्षी पतीचं निधन झालं आणि ती कमी वयातच विधवा बनली.
advertisement
3/9
लीना चांदवरकरने वयाच्या 24 व्या वर्षी सिद्धार्थ बांदोडकरशी लग्न केलं होतं. सिद्धार्थचे कुटुंब राजकारणात सक्रिय होतं. लीनाने लग्नानंतर चित्रपट सोडलं. लग्नानंतर अवघ्या 11 दिवसांतच लीना चांदवरकर यांच्या आयुष्यावर मोठी संकटे आली. बंदूक साफ करताना तिचा पती सिद्धार्थला गोळी लागली. या अपघातानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाला.
advertisement
4/9
पतीच्या निधनानंतर लीना आपल्या कुटुंबासोबत राहू लागली, पण त्यावेळी लोक तिला टोमणे मारायचे आणि म्हणायचे की तीच तिच्या पतीच्या मृत्यूचे कारण आहे. हे टोमणे ऐकून लीनाला एकदा आत्महत्येचा विचार आला. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/9
एके दिवशी मुंबईच्या रस्त्यावर तिला किशोर कुमारचा प्रस्ताव आला. अशा स्थितीत तिने किशोर कुमार यांना पुन्हा फोन केला आणि विचारले की आजही तुमचा प्रस्ताव तयार आहे का हे ऐकून किशोर कुमार लगेच हो म्हणाले.
advertisement
6/9
जेव्हा लीनाच्या कुटुंबियांना कळाले की त्यांची मुलीचे किशोर कुमारशी लग्न होणार आहे, तेव्हा त्यांना मोठा त्रास झाला. आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून आई-वडील संतापले आणि त्यांना मुंबई सोडायची इच्छा झाली.
advertisement
7/9
किशोर कुमार यांना त्यांच्या सासरच्या लोकांनी मुंबई सोडावी असं वाटत नव्हतं. त्यानंतर ते लीनाला तिच्या पालकांच्या घरी घेऊन जातो आणि ते मोठ्याने गाणे म्हणू लगातात आणि हे गाणे ऐकून सासरच्या लोकांना राग निघून जातो आणि ते दोघांचं नातं स्विकारतात.
advertisement
8/9
60-70 दशकातील अभिनेत्री लीना पहिल्या पतीच्या निधनानंतर किशोर कुमारच्या प्रेमात पडली. लीना आणि किशोर कुमार यांचं लग्न झालं. त्यांचं लग्न खूप चर्चेत राहिलं. किशोर कुमार लीनापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते.
advertisement
9/9
दरम्यान, मॉडेलिंग पासून लीनाने करिअरची सुरुवात केली होती. 18 व्या वर्षी तिला जाहिरातींमध्ये काम मिळू लागलं. 1968 मध्ये तिने मोन का मीत या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यातून ती रातोरात सुपरस्टार बनली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
25 व्या वर्षी अभिनेत्री झाली विधवा, नंतर 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत केलं दुसरं लग्न!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल