'आडनावामुळे कामं दिली नाहीत...', माधवी भाभीचे मराठी इंडस्ट्रीवर गंभीर आरोप, म्हणाली 'इतक्या खालच्या दर्जाची'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
TMKOC Madhavi Bhabhi : सोनालिका जोशीने एका पॉडकास्टमध्ये मराठी इंडस्ट्रीतील गटबाजी आणि आडनावावरून भेदभावाचा अनुभव सांगितला.
advertisement
1/8

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनालिका जोशी सध्या चर्चेत आहे. या मालिकेमुळे तिला ‘माधवी भीडे’ अशी ओळख मिळाली आहे.
advertisement
2/8
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या करिअरमधील एका धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीवर तिने गटबाजी आणि नावावरून भेदभाव केल्याचा मोठा आरोप केला आहे.
advertisement
3/8
सोनालिकाने नुकतीच जयंती वाघधरेच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांविषयी सांगितलं. ती म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीला फक्त माझ्या आडनावामुळे अनेक प्रोजेक्ट्स माझ्या हातातून गेले.”
advertisement
4/8
ती पुढे म्हणाली, “माझ्या नावामुळे लोकं म्हणायचे की, ‘ही कांबळे, आपल्या ग्रुपमध्ये बसत नाहीये.’ तुम्ही माझी कला किंवा माझं काम पाहिलं नाही, फक्त माझं आडनाव पाहिलं. तुम्ही अशी बाजू बघता, ज्याचं प्रेक्षकांना काहीच देणं-घेणं नाही.”
advertisement
5/8
सोनालिकाने असंही म्हटलं की, जर ती आज मराठी इंडस्ट्रीत आली असती, तर ती नक्कीच अधिक सक्रिय राहिली असती.
advertisement
6/8
सोनालिकाने पुढे सांगितलं की, त्यावेळी इंडस्ट्रीत ज्यांना आपण सीनियर मानत होतो, त्यांची मानसिकता खूप वाईट होती. ज्या कलाकारांना टीव्हीवर पाहून कौतुक वाटायचं, ‘व्वा, हे किती छान काम करतात,’ असं वाटायचं, त्यांची खरी मानसिकता इंडस्ट्रीत आल्यावर कळली.
advertisement
7/8
ती म्हणाली, “फक्त कलेतली सिनिऑरिटी काय कामाची आहे, जेव्हा तुमची मानसिकता इतक्या खालच्या दर्जाची आहे.”
advertisement
8/8
एखाद्या कलाकाराला तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी नाकारताय, त्याला खाली पाडताय, याचा त्यांनी कधीच विचार केला नाही, असंही ती म्हणाली. सोनालिकाच्या या वक्तव्यामुळे आता मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आडनावामुळे कामं दिली नाहीत...', माधवी भाभीचे मराठी इंडस्ट्रीवर गंभीर आरोप, म्हणाली 'इतक्या खालच्या दर्जाची'