Beautiful Women In World : जगातील Top 10 सुंदर महिला; यादीत मुंबईच्या 'या' सुंदरीने तर एश्वर्या रायलाही टाकलं मागे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Golden Ratio of Beauty या गणिती सूत्राच्या आधारे सौंदर्याचे मोजमाप करता येतेआणि हाच अभ्यास त्या सुंदर महिलांपैकी कोण जगातील सर्वात परिपूर्ण दिसते, हे निश्चित करतो.
advertisement
1/8

जगात ‘सौंदर्य’ मोजण्यासाठी नेमका कोणता मापदंड असू शकतो? हे ऐकून विचित्र वाटेल, पण ग्रीकांनी तयार केलेल्या Golden Ratio of Beauty या गणिती सूत्राच्या आधारे सौंदर्याचे मोजमाप करता येतेआणि हाच अभ्यास त्या सुंदर महिलांपैकी कोण जगातील सर्वात परिपूर्ण दिसते, हे निश्चित करतो.
advertisement
2/8
या नव्या अभ्यासानुसार हॉलिवूड अभिनेत्री एमा स्टोन हिला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत फक्त दोनच भारतीयांचा समावेश आहे. ज्यात ऐश्वर्या राय बच्चनही आहेत.
advertisement
3/8
मात्र यात आश्चर्य करण्यासारखी गोष्ट अशी की आपल्या ओळखीची भारतीय-अमेरीकन अभिनेत्री आहे, जिने या यादीत नाव मिळवलं आहे आणि आश्चर्य म्हणजे तिने सुंदरतेच्या बाबती मिस वर्ल्ड 1994 एश्वर्या राय हिला ही मागे टाकलं.
advertisement
4/8
ही अभिनेत्री आहे स्लम डॉग मिलेनिअर सिनेमामधील फ्रीडा पिंटो. 94.34 मार्क मिळवून फ्रीडा पिंटो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
advertisement
5/8
एमा स्टोननंतर सर्वात सुंदर महिलांच्या दुसऱ्या क्रमांकावर येते झेंडिया आणि थेट तिसरा क्रमांकवर सर्वात सुंदर महिलेचा खिताब फ्रीडा पिंटोला मिळाला आहे. त्यानंतर आठव्या क्रमांकावर ऐश्वर्य राय बच्चन आहे.
advertisement
6/8
फ्रीडा पिंटो ही खरंतर भारतीय आणि अमेरिकन अभिनेत्री आहेत. जिने अनेक हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे काही लोकप्रिय सिनेमे खाली दिले आहेत. ती जन्माने मुंबईची, पण तिचं करिअर बॉलिवूडमध्ये नाही तर थेट हॉलिवूडमध्ये सुरू झालं, जे खूपच अनोखं आहे.
advertisement
7/8
Slumdog Millionaire (2008) हा तिचा सर्वात प्रसिद्ध आणि ऑस्कर विजेता चित्रपट आहे आणि या सिनेमानं तिला एकाच रात्रीत इंटरनॅशनल स्टार बनवलं. या चित्रपटात तिने लतिकाची भूमिका केली आणि तिचं सौंदर्य, स्क्रीन प्रेझेन्स जगभरात चर्चेत आलं. याशिवाय तिने Rise of the Planet of the Apes (2011), Immortals (2011), You Will Meet a Tall Dark Stranger (2010) सारखे सिनेमा केले आहेत.
advertisement
8/8
फ्रीडाला Vogue, Elle, Harper’s Bazaar सारख्या इंटरनॅशनल मॅगझिन्सच्या कव्हरवर जागा मिळाली आहे. Dior, L’Oreal सारख्या लक्झरी ब्रँड्ससाठी ती ब्रँड अ‍ॅम्बेसेडर राहिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Beautiful Women In World : जगातील Top 10 सुंदर महिला; यादीत मुंबईच्या 'या' सुंदरीने तर एश्वर्या रायलाही टाकलं मागे