Usha Nadkarni: 'काम करताना मरण आलं पाहिजे..', उषा नाडकर्णीला अश्रू अनावर, असं का म्हणाल्या आऊ?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Usha Nadkarni: मराठी आणि हिंदी दोन्ही मनोरंजन विश्वात आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. वयाच्या 79 व्या वर्षीही एकदम जोमाने काम करत आहेत.
advertisement
1/7

मराठी आणि हिंदी दोन्ही मनोरंजन विश्वात आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. वयाच्या 79 व्या वर्षीही एकदम जोमाने काम करत आहेत.
advertisement
2/7
उषा नाडकर्णी यांचं आयुष्य जितकं रंगमंचावर झगमगतं, तितकंच खासगी आयुष्य मात्र निवांत आणि थोडंसे एकाकी आहे. वयाच्या79व्या वर्षीही त्या मुंबईत एकट्याच राहतात. उषाताईंनी नुकतीच 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी एकटं आयुष्य राहण्याविषयी सांगितलं.
advertisement
3/7
उषा यांनी एकटं का राहतात? याविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, "त्यांचा मुलगा आपल्याच संसारात गुंतलेला आहे आणि भावंडंही आता या जगात नाहीत. आणि माझं कामही इकडे असतं तर मी घरात नसते. मग तेरी इकडे राहून काय करणार. मग मी इकडे एकटीच राहते".
advertisement
4/7
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी त्यांना 'कलारत्न पुरस्कार' जाहीर झाला. त्या उत्साहाने आपल्या मुलाला सोबत येण्यासाठी म्हणाल्या, पण त्याने घरातील जबाबदारीमुळे नकार दिला. त्यावर उषा ताईंनी स्वतः Uber करून चर्चगेटला जाऊन कार्यक्रम गाठला.
advertisement
5/7
उषा नाडकर्णी म्हणाल्या, "कार्यक्रमात स्टेजवर जाताना त्यांना थोडं अस्थिर वाटलं. समोर उभ्या असलेल्या एका मुलाला मी हात मागितला आणि तो मला स्टेजवर घेऊन गेला. सुदेश भोसलेही मदतीला धावून आला. ही छोटी गोष्ट मनाला थोडी टोचली, पण मी समजून घेतलं.”
advertisement
6/7
उषा ताईंचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. त्या म्हणतात, “माझं तर असं म्हणणं आहे की, मला काम करताना मरण आलं पाहिजे. त्यातच मजा आहे!” त्यांना आजही कोणतीही सहानुभूती नको आहे. "लोकांनी मला बघून दुःखी वाटावं, मग त्यांना पाहून मला वाईट वाटावं असं व्हायला नको."
advertisement
7/7
दरम्यान, उषा नाडकर्णीने मराठी आणि हिंदीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. माहेरची साडी असो किंवा पवित्र रिश्ता अशा अनेक मालिका. सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Usha Nadkarni: 'काम करताना मरण आलं पाहिजे..', उषा नाडकर्णीला अश्रू अनावर, असं का म्हणाल्या आऊ?