Dharmendra Passes Away : मुंबईत 'हिरो' बनायला आले पण खिशात रूपया नव्हता, 200 रुपयांसाठी करावी लागली नोकरी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Dharmendra Struggle Story : बॉलिवूडमध्ये ‘ही-मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र आयुष्य संघर्षाची गाथा आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी लुधियाना जिल्ह्यातील नसराली नावाच्या एका छोट्या गावात झाला होता. केवळ किशन सिंग देओल यांचे सुपुत्र असलेल्या धर्मेंद्र यांचं मूळ नाव धरम सिंह देओल होते.
advertisement
1/7

गावामध्ये आपले संपूर्ण बालपण घालवणाऱ्या धर्मेंद्र यांना चित्रपटांचे एवढे वेड होतं की, चित्रपटगृहांपर्यंत पोहोचण्यासाठी ते मैलो मैलांचा प्रवास पायदळी करत असत. या वेडातूनच त्यांनी अभिनयात आपलं भविष्य निवडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
2/7
अभिनेत्री सुरैया यांचा दिल्लगी नावाचा चित्रपट पाहून धरमसिंह इतके भारावून गेले की, त्यांनी हा चित्रपट तब्बल 40 वेळा पाहिला. याचवेळी त्यांच्या मनात हिरो बनण्याची ललक जागी झाली. याच दरम्यान करोडो तरुण कलाकारांप्रमाणे धरम उर्फ धर्मेंद्र यांना मुंबईत होणाऱ्या फिल्मफेअर टॅलेंट अवॉर्डबद्दल माहिती मिळाली.
advertisement
3/7
धर्मेंद्र यांनी तत्काळ या स्पर्धेसाठी फॉर्म भरला. कुटुंबाची समजूत काढून ते पंजाबमधून मायानगरी मुंबईत दाखल झाले, पण इथं त्यांच्याकडे राहण्याची आणि जेवणाची कोणतीही सोय नव्हती. खिशात रुपया देखील नसल्याने धर्मेंद्र यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/7
एका ड्रिलिंग फर्ममध्ये काम करायला सुरुवात केली. या किरकोळ नोकरीतून त्यांना महिन्याकाठी केवळ 200 रुपये पगार मिळायचे. राहायला घर नसल्यामुळे ते एका गॅरेजमध्ये झोपायचे.
advertisement
5/7
या स्पर्धेमध्ये देशभरातील अनुभवी तरुणांनी भाग घेतला होता, मात्र कोणताही अनुभव नसतानाही धरमसिंह देओल यांनी या सर्वांना मागे टाकत हा अवॉर्ड जिंकला.
advertisement
6/7
स्पर्धेचे विजेते झाल्यावर त्यांच्यासाठी एका चित्रपटाचे आश्वासन देण्यात आले होते, पण दुर्दैवाने तो चित्रपट कधीच बनला नाही. कामाच्या शोधात धर्मेंद्र अनेक निर्मात्यांच्या ऑफिसचे उंबरठे झिजवत होते.
advertisement
7/7
धर्मेंद्र यांचा हा संघर्ष अनेक महिने सुरू राहिला. अखेरीस, दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांनी त्यांना दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून मोठा ब्रेक दिला आणि त्यानंतर धर्मेंद्र यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra Passes Away : मुंबईत 'हिरो' बनायला आले पण खिशात रूपया नव्हता, 200 रुपयांसाठी करावी लागली नोकरी!