TRENDING:

LIVE शूटींगमध्ये बेशुद्ध पडल्या आणि...; 'ठरलं तर मग' टीमने केलेली मदत 'पूर्णा आजी'ला आयुष्यभर लक्षात राहिली

Last Updated:
Jyoti Chandekar Passed Away : ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी शोक व्यक्त करत आहे. ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अनुभवी आणि प्रेमळ कलाकार हरपला.
advertisement
1/7
सेटवरच चक्कर येऊन पडल्या पूर्णा आजी, ‘ठरलं तर मग’च्या टीमने केलं होतं असं काही..
मुंबई: ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे.
advertisement
2/7
६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी आणि प्रेमळ कलाकार हरपला आहे.
advertisement
3/7
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आजपर्यंत २०० हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे.
advertisement
4/7
याआधीही ज्योती चांदेकर एकदा मृत्यूच्या दाढेतून परत आल्या होत्या, असा एक धक्कादायक किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर 'मंगळागौरी'चं शूटिंग सुरू होतं. त्या एका खुर्चीवर बसण्यासाठी गेल्या आणि अचानक बेशुद्ध होऊन पडल्या. त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाल्यामुळे हे घडलं होतं.
advertisement
5/7
त्या घटनेनंतर सेटवर एकच धावपळ उडाली. सगळेचजण घाबरले होते. त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना मालिकेच्या शूटिंगमधून दोन महिन्यांचा मोठा ब्रेक घ्यावा लागला.
advertisement
6/7
ज्योती चांदेकर यांनी याबद्दल बोलताना त्यांच्या टीमचे खूप कौतुक केलं. त्या म्हणाल्या, "कोणत्याही मालिकेतील टीम एका अभिनेत्रीसाठी दोन महिने थांबत नाही. पण हे सगळे माझ्यासाठी थांबले होते." त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यात खूप चांगलं बॉण्डिंग होतं. त्या दोन महिने मालिकेचं काम करत नसतानाही, टीमने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला.
advertisement
7/7
ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर उद्या, सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांना पौर्णिमा आणि तेजस्विनी या दोन मुली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
LIVE शूटींगमध्ये बेशुद्ध पडल्या आणि...; 'ठरलं तर मग' टीमने केलेली मदत 'पूर्णा आजी'ला आयुष्यभर लक्षात राहिली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल