...तर अमिताभ बच्चन कधीच झाले नसते स्टार हिरो, 'रेहमान'च्या वडिलांच्या एका निर्णयानं बदललं नशीब
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गेली अनेक बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन कधीच स्टार हिरो झाले नसते. धुरंधरच्या रेहमानच्या वडिलांच्या एका निर्णयामुळे अमिताभ यांचं नशीब बदललं.
advertisement
1/10

बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन’ म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयानं आणि व्यक्तिमत्त्वाने मोठं स्टारडम मिळवलं. 'जंझीर'पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 'डॉन', 'लावारिस', 'याराना', 'अभिमान', 'मिस्टर नटवरलाल' अशा अनेक सिनेमांमुळे सुपरहिट ठरला.
advertisement
2/10
गंभीर भूमिका, रोमँटिक सीन, कॉमेडी, डान्स असो प्रत्येक जॉनरमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यामुळे अमिताभ बच्चन कमर्शिअल सिनेमाचा चेहरा बनले.
advertisement
3/10
पण तुम्हाला माहितीये का अमिताभ बच्चन आता इतके मोठे स्टार नसते. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या एका निर्णयामुळे अमिताभ बच्चन यांचं करिअर यशाच्या शिखरावर पोहोचलं.
advertisement
4/10
अमिताभ बच्चन ज्या काळात स्ट्रगल करत होते त्याच काळात अभिनेते विनोद खन्ना हे एक मोठं नाव होतं. एकीकडे अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन, तर दुसरीकडे विनोद खन्ना हे हँडसम हंक म्हणून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. दोघांची व्यक्तिमत्त्वं पूर्णपणे वेगळी होती आणि त्यामुळेच एकत्र पडद्यावर दिसले की प्रेक्षक थिएटर डोक्यावर घ्यायचे.
advertisement
5/10
1982 हे वर्ष अमिताभ बच्चन यांच्या करिअरला कलाटणी देणारं ठरलं तर विनोद खन्ना यांच्या करिअरला मोठा धक्का देणारं. विनोद खन्ना यांनी सर्व काही सोडून आचार्य रजनीश म्हणजेच ओशो यांचे शिष्य बनण्याचा निर्णय घेतला. विनोद खन्ना अमेरिकेतील ओशो आश्रमात गेले.
advertisement
6/10
जर विनोद खन्ना ओशो आश्रमात गेले नसते तर अमिताभ बच्चन स्टार हिरो झालेच नसते असं आजही म्हटलं जात. विनोद खन्ना हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा तगडे अभिनेते होते.
advertisement
7/10
अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना दोघेही प्रामुख्यानं कमर्शियल सिनेमाचे हिरो होते. पण कमर्शियल सिनेमात केवळ अभिनय नाही, तर परफॉर्मर आणि एंटरटेनर असणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
advertisement
8/10
सोलो सुपरहिट्सच्या बाबतीत अमिताभ बच्चन नेहमीच पुढे होते. विनोद खन्नांच्या बहुतांश सुपरहिट फिल्म्स या को-स्टार म्हणून किंवा सुरुवातीच्या काळात खलनायक म्हणून आल्या होत्या.
advertisement
9/10
ओशो आश्रमातून परत आल्यानंतर विनोद खन्ना यांनी त्यांच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू केली आणि तीही दमदार ठरली. 'सत्यमेव जयते', 'दयावान'सारखे त्यांचे सिनेमे खूप गाजले. मात्र तोपर्यंत अमिताभ बच्चन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. दोघे एकत्र असलेल्या सिनेमांमध्ये आधी अमिताभ बच्चन यांचं नाव झळकायचं आणि नंतर विनोद खन्ना यांचं. त्यावेळी दिग्दर्शकांनी हा मोठा निर्णय घेतला होता.
advertisement
10/10
विनोद खन्ना ओशो आश्रमात गेले नसते तर अमिताभ बच्चन यांना त्यांनी मागे टाकले असतं असं अनेक जाणकारांचं मत आहे. स्पर्धेच्या चर्चांपलीकडे जाऊन विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन नेहमीच एकमेकांचा आदर करत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
...तर अमिताभ बच्चन कधीच झाले नसते स्टार हिरो, 'रेहमान'च्या वडिलांच्या एका निर्णयानं बदललं नशीब