TRENDING:

गुरूनाथने दिला धोका, पण खऱ्या आयुष्यात 18 वर्षांचा संसार; कोण आहे अनिता दातेचा नवरा? करतो काय?

Last Updated:
Anita Date Husband : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत राधिकाला गुरुनाथने तर धोक दिला. पण राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दातेचा 18 वर्षांचा सुखी संसार आहे. कोण आहे अनिता दातेचा नवरा?
advertisement
1/9
गुरूनाथने दिला धोका, खऱ्या आयुष्यात 18 वर्षांचा संसार;कोण आहे अनिता दातेचा नवरा?
मराठी टेलिव्हिजनविश्वातील एक कल्ट क्लासिक मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'.  या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनिता दाते आजही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.
advertisement
2/9
मालिकेतील तिचं राधिका हे पात्र आजही तितकंच लोकप्रिय आहे. एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअरवर आधारित या मालिकेनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं.
advertisement
3/9
  मालिकेत राधिकाचं वैवाहिक आयुष्य खूप अस्थिर होतं पण खऱ्या आयुष्यात अनिता दातेचं वैवाहिक आयुष्य मात्र अत्यंत स्थिर आणि आनंदी आहे.
advertisement
4/9
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने अनिता दातेला घराघरात पोहोचवलं. "मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको" ही टॅगलाइन प्रचंड गाजली होती.
advertisement
5/9
मालिकेत गुरुनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर हा राधिकाचा नवरा असतो. तो तिला फसवतो. त्यामुळे राधिकाच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण होतं. मालिकेतील हा भावनिक संघर्ष अनिता दातेनं इतका प्रभावी साकारला की प्रेक्षकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं.
advertisement
6/9
मात्र मालिकेतील वेदनादायी कथा आणि खऱ्या आयुष्यातील अनिता दातेचा खूप सुखी आणि आनंदी संसार आहे.  अनिता आणि चिन्मय यांचं नातं विश्वास, प्रेम आणि परस्पर आदरावर आधारित आहे. पण अनिता दातेचा नवरा कोण आहे माहितीये? 
advertisement
7/9
अनेक वर्ष प्रेक्षकांना असं वाटतं होतं की अनिता दातेचं लग्नच झालेलं नाही किंवा तिचा डिवोर्स झाला आहे. कारण तिने तिचं वैयक्तिक आयुष्य कधीच जगासमोर आणलेलं नाही. अनिता दातेचं खरं नाव अनिता चिन्मय केळकर आहे. तिचा नवरा म्हणजे सुप्रसिद्ध लेखक, समुपदेशक, दिग्दर्शक आणि अभिनेते चिन्मय केळकर.
advertisement
8/9
कला, साहित्य आणि मानसशास्त्र या क्षेत्रात सक्रिय असलेले चिन्मय केळकर हे मराठी सांस्कृतिक विश्वातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
9/9
अनिता आणि चिन्मय यांचं लव्ह मॅरेज असून, दोघांचा संसार आज 18 वर्षांचा आहे. मनोरंजन क्षेत्रातील व्यस्त वेळापत्रक असूनही, दोघांनी आपलं नातं अतिशय समजूतदारपणे जपलं आहे. अनेकदा मुलाखतींमध्ये अनिता दाते आपल्या नवऱ्याचं कौतुक करताना दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गुरूनाथने दिला धोका, पण खऱ्या आयुष्यात 18 वर्षांचा संसार; कोण आहे अनिता दातेचा नवरा? करतो काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल