TRENDING:

Dhurandhar : 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री कोण? करायची शॅम्पूची जाहिरात, आहे प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी

Last Updated:
Ranveer Singh Sara Arjun : 20 वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुन 40 वर्षीय रणवीर सिंहसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. नुकतंच 'धुरंधर'मध्ये याची झलक पाहायला मिळाली आहे.
advertisement
1/7
Dhurandhar : 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री कोण?
रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर' हा चित्रपट डिसेंबर महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त आणि अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 5 डिसेंबर 2025 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
2/7
'धुरंधर'चा ट्रेलर रिलीज होताच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे 20 वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुनने. 40 वर्षीय रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी सारा अर्जुन कोण आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
advertisement
3/7
सारा अर्जुनचा जन्म 2005 मध्ये झाला आहे. 2017 मध्ये आलेल्या 'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात काम केलेले अभिनेते राज अर्जुन यांची ही मुलगी आहे.
advertisement
4/7
सारा अर्जुन 18 महिन्यांची असल्यापासून इंडस्ट्रीय सक्रीय आहे. 18 महिन्यांची असताना तिने पहिली टीव्ही जाहिरात करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बालकलाकार म्हणून तिने तब्बल 100 पेक्षा अधिक जाहिरातींत काम केले.
advertisement
5/7
सारा अर्जुनला 'देवा थिरुमगल'मधील नीलाच्या भूमिकेने चांगलीच ओळख मिळाली. सारा अर्जुनने हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. साराने 2013 मध्ये 'एक थी डायन' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सैवम, सांड की आंख आणि पोन्नियिन सेलवन या चित्रपटांत साराने काम केलं आहे.
advertisement
6/7
'धुरंधर'च्या ट्रेलर लाँचदरम्यान सारा अर्जुनने या सिनेमादरम्यानचा आपला अनुभव शेअर केला. सारा म्हणाली,"रणवीरसोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं. आता हे स्वप्न सत्यात उतरलं असून माझा यावर विश्वास बसत नाही आहे. रणवीरसोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार".
advertisement
7/7
'धुरंधर'चे दिग्दर्शक आदित्य धर सारा अर्जुनबद्दल बोलताना म्हणाले की,"साराआधी आम्ही या पात्रासाठी 1,300 ऑडिशन घेतल्या होत्या. पण या सगळ्यांमधून आम्ही साराची निवड केली. कारण ती खूप एक उत्कृष्ट, दर्जेदार अभिनेत्री आहे. लवकरच ती रॉकस्टार होणार आहे".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar : 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री कोण? करायची शॅम्पूची जाहिरात, आहे प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल