TRENDING:

Thalapathy Vijay Divorce: 600 कोटींची संपत्ती, 27 वर्षांचा संसार, आता घटस्फोटाचा हिशोब! विजयच्या बायकोला किती पोटगी मिळणार?

Last Updated:
Thalapathy Vijay Divorce: संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंध आणि क्रूर वागणूक यांसारखे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, आता सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे पोटगी आणि मालमत्तेच्या वाटणीची.
advertisement
1/9
Thalapathy Vijay: 600 कोटींची संपत्ती, 27 वर्षांचा संसार, आता घटस्फोटाचा हिशोब!
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार थलापती विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने अखेर मौन सोडत चेन्नईतील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
advertisement
2/9
या अर्जात संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंध आणि क्रूर वागणूक यांसारखे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कायदेशीर लढाईत आता सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे पोटगी आणि मालमत्तेच्या वाटणीची.
advertisement
3/9
थलापती विजय सुमारे ६०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. संगीताने आपल्या अर्जात स्पष्टपणे मागणी केली आहे की, "विजयची सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रचंड उत्पन्न लक्षात घेऊन मला न्याय्य आणि सन्मानजनक पोटगी मिळावी."
advertisement
4/9
सोशल मीडियावर चर्चा आहे की, विजयला आपल्या संपत्तीतील निम्मा वाटा, म्हणजेच ३०० कोटी रुपये संगीताला द्यावे लागतील. पण वास्तव काहीसं वेगळं आहे.
advertisement
5/9
अनेक पाश्चात्य देशांत घटस्फोटाच्या वेळी संपत्तीचं ५०-५० टक्के वाटप होतं, पण भारतात कम्युनिटी प्रॉपर्टीचा नियम लागू नाही. भारतीय कायद्यानुसार, घटस्फोट झाला म्हणजे पत्नीला पतीच्या संपत्तीचा अर्धा भाग मिळेलच असं नाही.
advertisement
6/9
विजयचं वार्षिक उत्पन्न जे सुमारे २०० कोटींच्या वर आहे, मुलांचा सांभाळ, संगीताची स्वतःची संपत्ती जी सुमारे ४०० कोटींच्या आसपास असल्याचं बोललं जातं आणि लग्नानंतरचा त्यांचा जीवनस्तर या सर्व गोष्टींचा न्यायालय विचार करेल.
advertisement
7/9
हिंदू विवाह कायदा आणि विशेष विवाह कायद्यांतर्गत न्यायालय उचित आणि न्यायसंगत रक्कम ठरवतं. सहसा पतीच्या उत्पन्नाच्या २५ ते ३३ टक्के रक्कम पोटगी म्हणून दिली जाते, पण ती एकूण संपत्तीची अर्धी नसते.
advertisement
8/9
संगीताने आपल्या याचिकेत दावा केला आहे की, २०२१ पासून विजय एका अभिनेत्रीसोबतच्या संबंधांमुळे तिच्यापासून भावनिकदृष्ट्या दुरावला होता. इतकंच नाही तर, जाब विचारल्यावर तिच्यावर अनेक बंधनं लादली गेली.
advertisement
9/9
या प्रकरणाची पहिली सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. विजयने नुकताच आपला 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) हा राजकीय पक्ष स्थापन केला असून, ही कायदेशीर लढाई त्याच्या राजकीय भविष्यासाठीही मोठी कसोटी ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Thalapathy Vijay Divorce: 600 कोटींची संपत्ती, 27 वर्षांचा संसार, आता घटस्फोटाचा हिशोब! विजयच्या बायकोला किती पोटगी मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल