TRENDING:

तुम्ही दिवसातून किती खोटं बोलता? 'या' अभ्यासात आलं धक्कादायक सत्य समोर!

Last Updated:
'जर्नल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सोशल सायकॉलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार...
advertisement
1/6
तुम्ही दिवसातून किती खोटं बोलता? 'या' अभ्यासात आलं धक्कादायक सत्य समोर!
कधीकधी आपण खोटं बोलतो. कधी जीव वाचवण्यासाठी, तर कधी केवळ सवयीपोटी. काहीवेळा आपण विनाकारण खोटं बोलतो, इतरांना धोक्यात आणण्यासाठी किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. तसेच, अनेकदा आपण चांगल्या हेतूनेही खोटं बोलताना दिसतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, लोक दिवसातून किती वेळा खोटं बोलतात?
advertisement
2/6
काही संशोधकांचा अंदाज आहे की, सामान्य व्यक्ती दिवसाला 1-2 वेळा खोटं बोलते. इतर अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, लोक दिवसाला सरासरी 10-15 वेळा खोटं बोलतात.
advertisement
3/6
जर्नल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सोशल सायकॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, 60 टक्के लोक फक्त 10 मिनिटांच्या संवादानंतर खोटं बोलू लागतात.
advertisement
4/6
युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ॲट बर्मिंगहॅम येथील फसवणूक तज्ज्ञ टिमोथी लेविन म्हणतात की, खोटं बोलण्याचे प्रमाण यापेक्षाही कमी आहे. त्यांच्या मते, आपण दिवसाला सरासरी 2-3पेक्षा जास्त खोटं बोलत नाही.
advertisement
5/6
पामेला मेयर यांनी एका टॉक शोमध्ये खोटं बोलणाऱ्याला ओळखण्याचे काही मार्ग सांगितले. त्या म्हणाल्या की, खोटं बोलताना व्यक्ती आपल्या भाषणाची सुरुवात "खरं तर... किंवा प्रत्यक्षात..." असे बोलून करते.
advertisement
6/6
विज्ञान म्हणते की, जेव्हा तुम्ही खोटं बोलता, तेव्हा तुमच्या नाकाच्या आसपासचा भाग आणि डोळ्यांच्या आतील कोपरे गरम होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/General Knowledge/
तुम्ही दिवसातून किती खोटं बोलता? 'या' अभ्यासात आलं धक्कादायक सत्य समोर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल