Sunita Williams: अंतराळात राहून सुनीता विल्यम्स यांना मिळतो इतका पगार, ओव्हरटाईमचेही मिळतात पैसे!
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतीय वंशाची नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परत येण्याचं काउंटडाउन सुरू झालं आहे. पण सुनीता विल्यम्स यांना अंतराळात राहून किती पगार मिळत होता हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/8

भारतीय वंशाची नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परत येण्याचं काउंटडाउन सुरू झालं आहे. सुनीता आणि त्यांच्या सहकारी बुच हे मागील ९ महिन्यांपासून स्पेस स्टेशनमध्ये अडकून पडलेले आहे. पण आता त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. स्पेस X हे यान लवकरच त्यांना परत घेऊन येणार आहे. पण ९ महिने स्पेस स्टेशनमध्ये अडकल्यानंतरही त्यांना पगार सुरू होता. सुनीता विल्यम्स यांना अंतराळात राहून किती पगार मिळाला हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/8
सुनीता विल्यम्स यांच्या पगाराबद्दल आणि एकूण संपत्तीबद्दल काही माहिती समोर आली. सुनीता विल्यम्सचा वेतन श्रेणी FE आहे. अमेरिकन सरकारच्या वेतनश्रेणीनुसार, नासा अंतराळवीरांना अनुभव आणि श्रेणीनुसार वेतन दिले जाते, जे GS-13 ते GS-15 पर्यंत असते
advertisement
3/8
अनेक बातम्यांनुसार, एक अत्यंत अनुभवी अंतराळवीर म्हणून सुनीता विल्यम्स जीएस-१५ श्रेणीत येतात. ज्याचा अंदाजे वार्षिक पगार १५२,२५८ डॉलर भारतीय चलनामध्ये तब्बल १.३१ कोटी रुपये आहे.
advertisement
4/8
पगाराव्यतिरिक्त, नासाच्या अंतराळवीरांना आरोग्य विमा, प्रगत मिशन प्रशिक्षण, मानसिक आधार आणि प्रवास भत्ता यासह अनेक फायदे मिळतात. याशिवाय, नासा अंतराळवीरांना ओव्हरटाईम देखील देते.
advertisement
5/8
Marca.com नुसार, सुनीता विल्यम्स तिचे पती मायकेल जे. विल्यम्स यांच्यासोबत ह्युस्टन, टेक्सास येथे राहतात, जे फेडरल मार्शल आहेत. सुनीता विल्यम्सची अंदाजे एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर इतकी आहे.
advertisement
6/8
सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सह-अंतराळवीर बुच ५ जून २०२४ पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी, शनिवारी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून क्रू ड्रॅगन कॅप्सूल घेऊन जाणारे फाल्कन ९ रॉकेट यशस्वीरित्या उड्डाण करण्यात आले.
advertisement
7/8
क्रू-१० नावाच्या या मोहिमेअंतर्गत, विल्यम्स, विल्मोर आणि इतर दोन अंतराळवीरांच्या जागी चार सदस्यांची एक नवीन टीम आयएसएसमध्ये पाठवण्यात आली आहे.
advertisement
8/8
खरंतर, तो सहा महिन्यांपूर्वी त्याचा विल्यम्स यांचा सहकारी बुच विल्मोरसोबत परतणार होता. परंतु बोईंग स्टारलाइनरमधील तांत्रिक समस्येमुळे त्याला जास्त काळ अंतराळात राहावं लागलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/General Knowledge/
Sunita Williams: अंतराळात राहून सुनीता विल्यम्स यांना मिळतो इतका पगार, ओव्हरटाईमचेही मिळतात पैसे!