TRENDING:

Goa Night Club Fire: एक स्फोट झाला अन् सर्वत्र मृतदेहांचा पडला खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश्य

Last Updated:
Goa Night Club Fire: गोव्याची राजधानी पणजीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या अर्पोरा गावात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका नाईटक्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
advertisement
1/9
स्फोट झाला अन् सर्वत्र मृतदेहांचा पडला खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश
Goa Night Club Fire: गोव्याची राजधानी पणजीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या अर्पोरा गावात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका नाईटक्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
advertisement
2/9
सिलिंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून मृतांमध्ये बहुतांशी लोक नाईटक्लब कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे. तसेच यात काही पर्यटकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.
advertisement
3/9
गोवा पोलिसांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की रात्री १ वाजण्याच्या सुमारास नाईटक्लबच्या किचनजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की काही सेकंदातच आग संपूर्ण क्लबमध्ये पसरली.
advertisement
4/9
अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
advertisement
5/9
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की स्फोट झाला, नाईट क्लब बंद करण्याची तयारी सुरू असताना घडला आहे. गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
advertisement
6/9
स्थानिक पोलीस, एफएसएल टीम आणि जिल्हा प्रशासनाने घटनेचा सविस्तर तपास सुरू केला आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.
advertisement
7/9
डीजीपी म्हणाले की क्लबची आगीची सुरक्षा मानके, गॅस कनेक्शन आणि बाहेर पडण्याची योजना देखील तपासली जाईल. सध्या, नाईट क्लब सील करण्यात आला आहे आणि मालकांची चौकशी केली जात आहे.
advertisement
8/9
या दुर्घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
advertisement
9/9
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "पर्यटनाच्या हंगामातील ही एक दुःखद घटना आहे. आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई करू."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/गोवा/
Goa Night Club Fire: एक स्फोट झाला अन् सर्वत्र मृतदेहांचा पडला खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल