Weather Alert: 24 तासांत हवा बदलली, ठाण्याचा पारा चढला, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीच्या मध्यावर मोठे बदल जाणवत आहेत. 17 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून थंडी गायब झाली असून उन्हाचा चटका वाढला आहे. विशेषतः मुंबईसह ठाणे आणि कोकणात तापमानात मोठी वाढ झाली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात देखील हवामानात मोठे बदल जाणवत असून 17 फेब्रवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यात आज हवामान मुख्यत्वे कोरडे आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होऊन पारा 38 अंशावर पोहचल्याने उन्हाचा चटका अधिक जाणवेल. किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असून पहाटे काही प्रमाणात गारवा जाणवेल, तर दुपारच्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सेल्सिअस असून पहाटे काही प्रमाणात गारवा जाणवेळ, दुपारच्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे नागरिकांना उकाड्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे.त्यामुळे अनावश्यकय घराबाहेर पडणे टाळा आणि हायड्रेटेड रहावे.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसांपासून किमान व कमाल तापमान स्थिर आहे. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिवसभर ऊन आणि काही प्रमाणात आर्द्रता राहील, ज्यामुळे उष्णतेचा तडाखा अधिक जाणवेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण व दमट असून, किमान तापमान 20- 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36-37 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री हलकी थंडी जाणवू शकते, तर दुपारी उष्णतेत वाढ होऊन उन्हाचा तडाखा अधिक असेल.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसवर राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण, कोरडे आणि स्वच्छ राहील. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20-22 अंश सेल्सिअस असेल. कडक उन्हामुळे दुपारी उष्णता जास्त असेल, परंतु रात्र आणि पहाटे हलकी थंडी जाणवेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: 24 तासांत हवा बदलली, ठाण्याचा पारा चढला, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट