Rinku Rajguru : 'मला त्या फंद्यातच नाही पडायचं', प्यार में गहरी चोट! प्रेमाबद्दल असं का म्हणाली रिंकू राजगुरू?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : मला प्रेमाच्या फंद्यात पडायचंच नाहीये असं रिंकूनं थेट सांगितलं. प्रेमात असताना रिंकूबरोबर असं काय घडलं होतं?
advertisement
1/7

अभिनेत्री रिंकू राजगुरूचा पुन्हा एकदा साडे माडे तीन हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. रिंकू तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याचं चर्चेत येतेय. रिंकूच्या लव्ह लाईफची चांगलीच चर्चा रंगली आहे. रिंकूनं स्वत: तिच्या लग्नाबद्दलच्या आणि नात्याबद्दलच्या कन्सेप्ट सांगितल्या आहेत.
advertisement
2/7
अलिकडेच एका मुलाखतीत रिंकूनं तिच्या ब्रेकअपबद्दलही सांगितलं. रिंकू लग्न कधी करणार? तिचा बॉयफ्रेंड कोण आहे अशा अनेक चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहेत. मात्र अनेक वर्षांनी रिंकूनं या सगळ्यावर उघडपणे भाष्य केलं. रिंकूचा बॉयफ्रेंड होता. ती प्रेमात पडली होती. मात्र काही कारणांनी त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर आता रिंकू सिंगल आहे.
advertisement
3/7
असं म्हणतात की ब्रेकअप माणसाला खूप काही शिकवतं. रिंकूच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. ब्रेकअपनं आता मला त्या फंद्यातच पडायचं नाहीये, असं रिंकूनं सांगितलं. असं म्हणण्याइतपत रिंकूच्या आयुष्यात आलंय काय?
advertisement
4/7
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लव्ह लाईफबद्दल रिंकू म्हणाली, "लग्न ही गोष्ट मला खूप मॅटर करते. तर मी पुढे जाऊ शकते किंवा तितका हक्क दाखवू शकतो. आता मी आजूबाजूला मुलं मुली बघते, माझा त्यात काही अनुभव असेल. ते पाहून आपण एका नोटवर येतो की इमोशनली आपण स्वत:शी आणि दुसऱ्याशी नको खेळायला."
advertisement
5/7
"एकदा ते डॅमेज होतं मग त्या नात्यांवरचा, माणसांवरचा विश्वास उडत जातो. त्यामुळे नकोच. कोणा एकामुळे प्रेम वाईट असं म्हणण्यापेक्षा आपण छान राहिलेलं कधीही बरं. कधी कधी असं होतं की, हे वाईटच आहे. आपण इतकं हर्ट होणार असू तर ही गोष्टच आपल्याला आयुष्यात नकोय."
advertisement
6/7
रिंकू पुढे म्हणाली, "मला आधी कोणीतरी आवडलेलं पण आता मी खरंच सिंगल आहे. मला सध्यातरी या फंद्यातच नाही पडायचं."
advertisement
7/7
"लग्न आणि शेवटपर्यंत तू सोबत असणार असशील मला काही प्रोब्लेम नाहीये. पण हे ट्राय करू, वाट्टेल तसे वाट्टेल तेव्हा येणार लोक आणि जाणार ते मला नाही झेपणार", असंही रिंकू म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'मला त्या फंद्यातच नाही पडायचं', प्यार में गहरी चोट! प्रेमाबद्दल असं का म्हणाली रिंकू राजगुरू?