Konkan Weather Update : रत्नागिरीत पावसाला सुरुवात; पुढील 3 दिवस कोकणात पावसाचा यलो अलर्ट, IMD कडून महत्त्वाची अपडेट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली होती, मात्र आता पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली होती, मात्र आता पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/5
रत्नागिरी जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे.
advertisement
3/5
रत्नागिरीत गेले चार दिवस पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि परिसरात पावसानं हजेरी लावली आहे.
advertisement
4/5
हवामान खात्याकडून रत्नागिरीला आजपासून पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
advertisement
5/5
पावसाला म्हणावा तसा जोर नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Konkan Weather Update : रत्नागिरीत पावसाला सुरुवात; पुढील 3 दिवस कोकणात पावसाचा यलो अलर्ट, IMD कडून महत्त्वाची अपडेट