Rohit Sharma : 'माझे प्रयत्न नेहमीच...', पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर रोहित शर्माने दिली पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला हिटमॅन?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma On Padma Shri Award : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल भारत सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. हा सन्मान मिळाल्याचा अभिमान असल्याचे सांगत त्याने देश आणि चाहत्यांचेही विशेष आभार मानले.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा याला हरमनप्रीत कौरसह केंद्र सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यावर हिटमॅनने पहिली प्रतिक्रिया झाली आहे.
advertisement
2/7
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मानं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल भारत सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाची दखल असल्याचं त्यानं नमूद केलं.
advertisement
3/7
पद्मश्री अवॉर्ड मिळाल्यानंतर मी भारत सरकारचे आभार मानतो. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटूंबियांसाठी खास क्षण आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.
advertisement
4/7
माझ्या करियरमध्ये ज्या ज्या लोकांनी महत्त्वाचा रोल निभावला त्याचे देखील आभार मानतो. माझे प्रयत्न असेच चालू राहतील, असं विश्वास देखील रोहित शर्माने व्यक्त केला.
advertisement
5/7
देशासाठी मॅच खेळणं आणि देशासाठी ट्रॉफी जिंकणं यासाठी माझा प्रयत्न असेल, असं आश्वासन देखील रोहित शर्माने दिलं आहे.
advertisement
6/7
दुरदर्शन स्पोर्ट्सने रोहित शर्माचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये तो आभार मानताना दिसतोय.
advertisement
7/7
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने 2024 मध्ये टी-20 विश्वचषक पटकावला. तर 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. याची दखल सरकारने घेतली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'माझे प्रयत्न नेहमीच...', पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर रोहित शर्माने दिली पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला हिटमॅन?