Priyadarshani Indalkar : कोण होता प्रियदर्शनी इंदलकरचा बॉयफ्रेंड? 10 महिन्यांपूर्वी ब्रेकअप, टॉक्सिक झालं होतं नातं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Priyadarshani Indalkar Break Up : अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने नुकत्याच एका शोमध्ये तिच्या ब्रेकअपविषयी सांगितलं. कोण होता तिचा बॉयफ्रेंड असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
advertisement
1/11

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शन इंदलकर ही लाखो तरुणांची क्रश आहे. प्रियदर्शनची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.
advertisement
2/11
प्रियदर्शनी नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. प्रियदर्शनीच्या कामाबरोबरच तिच्या लव्ह लाइफचीही चर्चा होत असते.
advertisement
3/11
प्रियदर्शनची नाव अभिनेता ओंकार राऊतबरोबर जोडण्यात आलं होतं. पण दोघांनी कधीच याबाबत स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही.
advertisement
4/11
दरम्यान प्रियदर्शनीचा ब्रेकअप झाल्याची माहिती तिनं स्वत: दिली आहे. 10 महिन्यांआधीच प्रियदर्शनीचा ब्रेकअप झाला आहे. प्रियदर्शनीने तिच्या ब्रेकअपची A To Z स्टोरी सांगितली.
advertisement
5/11
प्रियदर्शनी नुकतीच कॉमेडियन आणि बिग बॉस फेम प्रणित मोरेच्या शोमध्ये पोहोचली होती. तिथे प्रणितच्या प्रश्नांची उत्तर देत असताना प्रियदर्शनीच्या ब्रेकअपची स्टोरीही समोर आली.
advertisement
6/11
प्रणितने प्रियदर्शनीला तिचा रिलेशन स्टेटसबद्दल विचारलं. त्यावर प्रियदर्शनी म्हणाली, "मी सिंगल आहे. एप्रिल 2025 मध्ये आमचं ब्रेकअप झालं."
advertisement
7/11
प्रणितने प्रियदर्शनीला तिच्या ब्रेकअपचं कारण विचारलं. ती म्हणाली, "जुळलं नाही, Compatibility नव्हती. तो किंवा मी टॉक्सिक नव्हतो. पण आमचं रिलेशनशिपचं टॉक्सिक होतं."
advertisement
8/11
ब्रेकअपचं कारण सांगत प्रियदर्शनी म्हणाली, "त्याला लवकर लग्न करायचं होतं. कारण तो माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होता. मला लग्नाची घाई नव्हती. यावरून आमच्यात वाद सुरू होते. त्यामुळे आमचं जमलं नाही आलं."
advertisement
9/11
प्रियदर्शनी इंदलकर ज्याच्या प्रेमात होती तो मुलगा नेमका कोण होता असा प्रश्न तिच्या लाखो चाहत्यांना पडला आहे. पण प्रियदर्शनीने प्रणित मोरेच्या शोमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव सांगितलेलं नाही.
advertisement
10/11
प्रियदर्शनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तिचा 'लग्नाचा शॉट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 6 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. अभिनेता अभिजित आमकरबरोबर ती स्क्रिन शेअर करणार आहे.
advertisement
11/11
त्याआधी 2025 मध्ये प्रियदर्शनी 'दशावतार' या सिनेमात दिसली होती. या सिनेमातील तिची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली. 'दशावतार' सिनेमानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांपैकी एक 'दशावतार' हा सिनेमा होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priyadarshani Indalkar : कोण होता प्रियदर्शनी इंदलकरचा बॉयफ्रेंड? 10 महिन्यांपूर्वी ब्रेकअप, टॉक्सिक झालं होतं नातं