Malvan : आदित्य ठाकरे-निलेश राणे पहिल्यांदाच समोरासमोर; राणे भडकले, म्हणाले, त्याला सांगा...
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Malvan Shivaji Maharaj Statue : मालवणात आदित्य ठाकरे आणि निलेश राणे आमने सामने येताच दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राणे गटाकडून आदित्य ठाकरेंना बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती.
advertisement
1/7

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं आता राज्यात वातावऱण तापलं आहे. पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आणि त्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मविआने केला आहे.
advertisement
2/7
किल्ल्यावर जिथं पुतळा पडला तिथं मविआचे नेते भेट देण्यासाठी गेले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गेले असताना तिथे खासदार नारायण राणे आणि निलेश राणेही तिथे आले. तेव्हा दोन्ही गटाच्या नेत्यांचे समर्थक आमने सामने आले.
advertisement
3/7
राणे पिता-पुत्र पोलिसांवर भडकले. आदित्य ठाकरेंना बाहेर काढा अशी आक्रमक भूमिका नारायण राणे आणि निलेश राणे यांनी घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.
advertisement
4/7
दहा फुटाचा रस्ता दिलाय त्याला. आम्ही जाणार नाही, त्याला सांगा, दहा फुटाचा रस्ता सोडलाय, जाऊदे त्याला असं म्हणत निलेश राणे संतापले. पोलिसांचा मोठा फौजफाटा पुतळ्याच्या परिसरात तैनात करण्यात आला आहे.
advertisement
5/7
भाजपचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले होते. तेव्हा निलेश राणे यांनी त्याला १० फुटांचा रस्ता सोडलाय. वाट मोकळी करून दिलीय. काही होणार नाही त्याला. त्यांना जाऊदे असं म्हटलं.
advertisement
6/7
ठाकरे गटाचे समर्थक जात असताना घोषणाबाजी करण्यात आली. पेंग्विन, पेंग्विन असं म्हणत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही बाहेर पडताना घोषणाबाजी केली. यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला.
advertisement
7/7
नारायण राणे यांचे सहकारी पुतळा बघून बाहेर चालले होते. आम्ही आत गेलो होते. त्यानंतर बाचाबाची झाली. सामंजस्याने घ्यायला हवं. यातून मार्ग निघायला हवा असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Malvan : आदित्य ठाकरे-निलेश राणे पहिल्यांदाच समोरासमोर; राणे भडकले, म्हणाले, त्याला सांगा...