किल्ले रायगड पर्यटकांसाठी इतके दिवस बंद, पायऱ्यांवरचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी परिस्थीत निर्माण झालीय.
advertisement
2/5
रायगड किल्ल्यावर तुफान पाऊस बरसल्याने अनेक पर्यटक आणि शिवभक्त वरून पडणाऱ्या पाण्यामुळे उतरताना पायऱ्यांवर अडकून पडले असल्याचे दिसून आले.
advertisement
3/5
रायगडावरून पाण्याचे मोठे प्रवाह वाहत असलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद केला आहे.
advertisement
4/5
रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
advertisement
5/5
सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवेने गड उतार करण्यात येत आहे. रोप वे प्रशासनाकडून रोपवे किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे . 31 जुलैपर्यंत कुणीही रायगड किल्यावर जाऊ नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
किल्ले रायगड पर्यटकांसाठी इतके दिवस बंद, पायऱ्यांवरचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय