TRENDING:

Curd Tip : फक्त 20 मिनिटात लावा दही, घरच्या घरी हेल्दी आणि घट्ट दही बनवण्याची ट्रीक आत्ताच जाणून घ्या

Last Updated:
घरगुती पद्धतीने तुम्ही अवघ्या 15-20 मिनिटांत बाजारासारखी घट्ट, चवदार दही सहज तयार करू शकता आणि तीही कोणत्याही महागड्या मशिन्स किंवा स्पेशल घटकांशिवाय.
advertisement
1/8
फक्त 20 मिनिटात लावा दही, घरच्या घरी घट्ट दही बनवण्याची ट्रीक लगेच जाणून घ्या
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की स्वयंपाकघरात एक प्रश्न हमखास निर्माण होतो, ते म्हणजे दही नीट लागत नाही? कधी ते पातळ होतं, तर कधी आंबटसर होतं. अगदी वेळेवर दही लागत नसेल तर अशावेळी जेवणाचा सारा बेतच बिघडतो. मग काहीतरी वेगळा पर्याय गृहिणींना पाहावा लागतो किंवा मग कधी तरी बाहेरुन दही आणावं लागतं. विशेषतः फोडणीचं ताक, घरचं रायता, कोशिंबीर, बिर्याणी किंवा दह्याचं भात यासाठी चांगल्या दह्याची गरज भासतेच.
advertisement
2/8
पण याच समस्येवर आता एक अशी देसी ट्रिक समोर आली आहे, जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या घरगुती पद्धतीने तुम्ही अवघ्या 15-20 मिनिटांत बाजारासारखी घट्ट, चवदार दही सहज तयार करू शकता आणि तीही कोणत्याही महागड्या मशिन्स किंवा स्पेशल घटकांशिवाय.
advertisement
3/8
दही लागत नाही? कारण काय असतं?दही लागण्यासाठी दूधाचं तापमान आणि वापरलेला 'स्टार्टर कल्चर' (जमलेलं दही) फार महत्त्वाचं असतं. जर दूध खूप गरम असेल तर दही लागत नाही किंवा फाटतं. थंड असेल, तर ते लागतच नाही. पावसाळ्यात घरात थंडी किंवा ओलावा जास्त असतो आणि त्यामुळे लागलेली दही पातळसर किंवा आंबट होण्याची शक्यता वाढते.
advertisement
4/8
आता जाणून घ्या ही 'देसी ट्रिक'फुल क्रीम दूध 500 मिली, ताजं, सत्व असलेलं दही १ चमचा, स्टीलचा डबा किंवा वाटी, मोठं भांडं ज्यात गरम पाणी ठेवता येईल, एक झाकण किंवा स्वच्छ कापड
advertisement
5/8
पद्धत:दूध उकळा आणि त्याला गार होऊ द्या, पण पूर्ण थंड होऊ देऊ नका. बोट लावल्यावर जरा गरम वाटलं पाहिजे, हेच दही लावण्याचं योग्य तापमान असतं.आता स्टीलच्या डब्यात दूध ओता आणि त्यात 1 चमचा ताजं दही मिसळा. हलक्या हाताने चमच्याने ढवळा.
advertisement
6/8
हे दह्याचं डबं एका मोठ्या भांड्यात ठेवा, ज्यात आधीच उबदार पाणी आहे. पाणी इतकं असावं की दह्याचं भांडं १/४ किंवा अर्धं बुडेल. पण लक्षात ठेवा – पाणी डब्याच्या आत जाऊ देऊ नका. वरून झाकण ठेवा किंवा कापड गुंडाळा, जेणेकरून उष्णता टिकून राहील.
advertisement
7/8
अवघ्या 15 ते 20 मिनिटांत तुम्हाला बाजारात मिळतं तसंच दही. घट्ट आणि चवदार तयार झालेलं दिसेल.
advertisement
8/8
ही ट्रिक इतकी प्रभावी का आहे?या पद्धतीमुळे दही लागण्यासाठी लागणाऱ्या योग्य तापमानाची स्थिती तयार होते (साधारण ३५-४२°C). त्यामुळे नेहमीसारखी 6-8 तासांची वाट पाहण्याची गरज उरत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Curd Tip : फक्त 20 मिनिटात लावा दही, घरच्या घरी हेल्दी आणि घट्ट दही बनवण्याची ट्रीक आत्ताच जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल