Kitchen Tips : खिचडी बनवताना हळद जास्त पडली? चिंता सोडा, 'या' टिप्सने चुटकीसरशी चव होईल बॅलेन्स..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to adjust access turmeric in khichadi : आपल्याकडे बहुतांश लोकांना खिचडी हा प्रकार खूप आवडतो. काही लोकांना तर भातच इतका आवडतो की, ते कोणत्याही प्रकारे रोज भट घाटात. मात्र सर्वात जास्त प्रमाण खिचडीचे असते. मात्र एखादेवेळी चुकून खिचडीत हळद जास्त पडली तर.. आज यावर आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगत आहोत.
advertisement
1/7

अँटिबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध हळद, अन्नाची चव आणि रंग तर वाढवतेच पण अनेक प्रकारच्या संसर्गापासून आपले संरक्षण करते. भारतीय खाद्य खिचडी आकर्षक आणि चवदार बनवण्यासाठी एक चिमूटभर किंवा आवश्यकतेनुसार हळद पुरेशी आहे.
advertisement
2/7
घाईगडबडीमध्ये किंवा चुकून काहीवेळा खिचडीमध्ये जास्त प्रमाणात हळद पडली तर तिची चव आणि रंग दोन्ही खराब होतात. असे झाल्यास काळजी करू नका. खाली दिलेल्या कोणत्याही उपायाने तुम्ही खिचडी खराब होण्यापासून वाचवू शकता.
advertisement
3/7
नारळाचे दूध : तुमच्या खिचडीमध्ये जास्त हळद असल्यास काळजी करू नका. यासाठी एक कच्चे नारळ घेऊन मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या आणि त्याचे दूध सुती कापडाच्या मदतीने गाळून घ्या आणि त्यात चांगले मिसळा. असे केल्याने हळदीचा कडवटपणा आणि गडद रंग दोन्ही निघून जातात.
advertisement
4/7
म्हशीचे दूध : सर्व घरांमध्ये दूध सहज उपलब्ध असते. जर तुमच्या खिचडीमध्ये हळद जास्त असेल तर तिचा कडवटपणा आणि गडद पिवळा रंग संतुलित करण्यासाठी, खिचडीमध्ये अर्धी वाटी थंड दूध घालून ते चांगले मिसळा. आता खिचडी थोडी गरम करा, असे केल्याने तिची चव आणि रंग दोन्ही संतुलित होतील.
advertisement
5/7
दही : खिचडीचा रंग आणि चव यांचा समतोल साधण्याचा उत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे त्यात दही घालणे. मिक्सरमध्ये हलवून गुळगुळीत दही बनवा आणि खिचडीमध्ये अर्धी वाटी दही घालून मिक्स करा. दही व्यवस्थित फेटलेले असणे महत्त्वाचे आहे. कारण दह्यामध्ये गुठळ्या असतात. जर तुम्ही गुठळ्यांसोबत दही घातले तर ते खिचडीमध्ये वेगळे दिसते.
advertisement
6/7
खिचडीमध्ये दही किंवा दूध घालताना प्रमाण लक्षात ठेवा. योग्य प्रमाण आवश्यक आहे. कारण ते जास्त प्रमाणात घातल्याने खिचडीच्या चवीवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : खिचडी बनवताना हळद जास्त पडली? चिंता सोडा, 'या' टिप्सने चुटकीसरशी चव होईल बॅलेन्स..